काबूल -अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) आगामी एकदिवसीय विश्वकरंडकासाठी संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व गुलबदीन नैबकडे देण्यात आले आहे.
३ वर्षांनतंर हमीद हसनला एकदिवसीय संघात स्थान
विश्वकरंडकासाठीच्या संघात गोलंदाज हमीद हसनला स्थान देण्यात आले आहे. त्याने आपला अखेरचा एकदिवसीय सामना २०१६ मध्ये खेळला होता. हसनने आतापर्यंत ३२ सामन्यांमध्ये ५६ बळी घेतले आहेत.
पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानसमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान
विश्वकरंडक स्पर्धेत अफगाणिस्तानचा पहिला सामना 1 जूनला बलाढ्य आणि पाच वनडे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. विश्वकरंडक स्पर्धेला ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे.
विश्वकरंडक स्पर्धेला काहीच दिवस शिल्लक असताना 'एसीबी'ने असगर अफगानकडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारचे कर्णधारपद काढून घेत, विश्वकरंडकासाठी एकदिवसीय संघाचे नेतृत्व नैबकडे तर उपकर्णधारपद स्टार अष्ठपैलू खेळाडू राशिद खानकडे सोपवले आहे.