मेलबर्न - मेलबर्न रेनेगेड्सचा कर्णधार आरोन फिंच बीग बॅश लीगच्या अंतिम सामन्यात धावबाद झाल्याने चांगलाच संतापला. ड्रेसिंग रुममध्ये परतताना त्यांने आपला राग तेथे असलेल्या खुर्चीवर काढला. रविवारी १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या अंतिम सामन्यात मेलबर्न रेनेगेड्सचा सामना मेलबर्न स्टार्स विरुद्ध डॉकलंडच्या स्टेडियमवर झाला. या सामन्यात १३ धावांवर धावबाद झाला.
VIDEO: धावबाद झाल्यानंतर आरोन फिंचने खुर्चीवर काढला राग - aaron finch
फिंच नाराज होऊन मैदानाबाहेर गेला. त्यानंतर तो ड्रेसिंग रुमकडे जाताना खुर्चीवर राग काढला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे.
आरोन फिंच
सहाव्या षटकातील शेवटचा चेंडू कॅमरुन व्हाईटने जॅक्सन बर्डकडे मारला. त्यानंतर तो चेंडू त्याच्या पायाला लागून यष्ट्यावर आदळला. तिसऱ्या पंचांनी त्याला धावाबाद दिले. रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते की फिंच क्रीजमध्ये पोहचला नव्हता.
फिंच नाराज होऊन मैदानाबाहेर गेला. त्यानंतर तो ड्रेसिंग रुमकडे जाताना खुर्चीवर राग काढला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे.