लाहोर - आगामी काळात पाकिस्तानला साडेसात फुटाच्या उंचीचा वेगवान गोलंदाज मिळण्याची शक्यता आहे. लाहोरच्या मुदस्सर गुर्जरला पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये (पीएसएल) संधी दिली जाऊ शकते. मुदस्सरची उंची ७ फूट ६ इंच अशी आहे.
पाकिस्तानला मिळू शकतो 'हा' साडे सात फुटाचा गोलंदाज! - mudassar gujjar cricketer news
लाहोरच्या मुदस्सर गुर्जरला पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये (पीएसएल) संधी दिली जाऊ शकते. तो पीएसएलमध्ये खेळेल अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानमध्ये इतक्या उंच क्रिकेटपटूची चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
मुदस्सर गुर्जरला पाकिस्तान सुपर लीगच्या लाहोर कलंदर या संघाने आपल्या विकास कार्यक्रमात समाविष्ट केले आहे. तो पीएसएलमध्ये खेळेल अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानमध्ये इतक्या उंच क्रिकेटपटूची चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मोहम्मद इरफान (७ फूट १ इंच) हा खेळाडू त्याच्या उंचीमुळे चर्चेत आला होता.
''मी माझ्या उंचीमुळे वेगाने धावू शकतो आणि जगातील सर्वात वेगवान गोलंदाज बनू शकतो. मी सात महिन्यांपूर्वी क्रिकेटचा सराव करायला सुरुवात केली होती. पण कोरोनामुळे मध्येच सराव थांबवावा लागला. मी एके दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगातील सर्वात उंच गोलंदाज होईन'', असे मुदस्सरने एका मुलाखतीमध्ये सांगितले.