महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विश्वचषक २०१९ नंतर हे ५ दिग्गज गोलंदाज होऊ शकतात निवृत्त

लंकेचा ३५ वर्षीय गोलंदाज लसिथ मलिंगा यार्कर स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो. त्याने कसोटी क्रिकेटला यापूर्वीच अलविदा म्हटले आहे. एकदिवसीय आणि टी-२० संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. महेला, दिलशान, संगकारासारखे महत्त्वाचे खेळाडू मागील विश्वचषकात निवृत्त झाल्याने लंकेचा संघ दुबळा झाला आहे

bowlers

By

Published : Feb 5, 2019, 3:34 PM IST

मुंबई - क्रिकेटच्या इतिहासात सर्वच दिग्गज खेळाडू विश्वचषकानंतर निवृत्त होतात. श्रीलंकेचा कर्णधार महेला जयवर्धने, कुमार संगकारा, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान मायकल क्लार्क यांनी २०१५ च्या विश्वचषकानंतर क्रिकेटला बायबाय केले. यंदाच्या विश्वचषक २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये होणार आहे. सर्वच संघ या स्पर्धेच्या तयारीला लागले आहे. यात अनेक दिग्गज गोलंदाज त्याच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. ते या विश्वचषकानंतर क्रिकेटमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे.

स्टुअर्ट ब्रॉड


इंग्लंडचा ३२ वर्षीय वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने त्याचा शेवटाच एकदिवसीय सामना २०१६ मध्ये खेळला होता. ब्रॉड हा इंग्लंडच्या कसोटी संघाचा नियमित सदस्य आहे. त्याने १२१ एकदिवसीय सामन्यात १७८ गडी बाद केले. तर १२४ कसोटीत ४३३ बळी घेतले आहेत. त्याच्या नावावर एका कसोटी शतकीची देखील नोंद आहे. त्याने २०१० मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना शतक केले होते. त्याच सामन्यात जोनाथन ट्रॉट आणि स्टुअर्ट ब्रॉडने ८ व्या गड्यासाठी ३३२ धावांची विक्रमी भागीदारी रचली होती. सध्या तो एकदिवसीय संघातून बाहेर आहे. येत्या विश्वचषकानंतर तो क्रिकेटला बायबाय करु शकतो.

मशरफे मुर्तजा


नारेल एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा वेगवान गोलंदाज मशरफे मुर्तजा २०१९ च्या विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बाय बाय करु शकतो. बॉलिंग ऑलराउंडर म्हणून संघात खेळणाऱ्या या खेळाडूचा बांगलादेशकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम आहे. त्याने टी-२० मध्ये सर्वाधिक गडी बाद करण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुर्तजाने २०२ एकदिवसीय सामन्यात २५८ आणि १७२८ धावा तर ३६ कसोटीत ७८ बळी घेतले आहेत. तर ५४ टी-२० सामन्यात ४२ गडी बाद केले आहेत. सध्या तो बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये रंगपूर रायडर्सकडून खेळत आहे. या संघाकडून खेळताना त्याने ७ सामन्यात १२ गडी बाद केले.

लसिथ मलिंगा


लंकेचा ३५ वर्षीय गोलंदाज लसिथ मलिंगा यार्कर स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो. त्याने कसोटी क्रिकेटला यापूर्वीच अलविदा म्हटले आहे. एकदिवसीय आणि टी-२० संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. महेला, दिलशान, संगकारासारखे महत्त्वाचे खेळाडू मागील विश्वचषकात निवृत्त झाल्याने लंकेचा संघ दुबळा झाला आहे. येणाऱ्या विश्वचषकात लंकेच्या संघाला त्याचा अनुभव कामी येऊ शकतो. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या ३ एकदिवसीय सामन्यात ७ गडी बाद केले आहेत. २००७ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना ४ चेंडूत ४ गडी बाद करण्याचा अनोखा पराक्रम केला होता. आयपीएलच्या इतिहासात त्याने १५४ गडी बाद केले आहेत. येत्या विश्वचषकात तो क्रिकेटला बाय-बाय करु शकतो.

जेम्स अँडरसन


कसोटी क्रिकेटमधील अव्वल गोलंदाज जेम्स अँडरसन येत्या विश्वचषकात क्रिकेटला बाय बाय करु शकतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने १९४ एकदिवसीय सामन्यात २६९ गडी बाद केले. तर १४५ कसोटीत ५६५ बळी घेतले. नुकतेच त्याने ग्लेन मॅक्ग्राचा विक्रम मोडीत काढला. लॉर्ड्सच्या मैदानावर १०० बळी घेण्याची किमया त्याने करुन दाखवली आहे.

डेल स्टेन


स्टेन गन नावाने प्रसिध्द असलेला दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज डेल स्टेन स्विंग आणि गतीसाठी प्रसिध्द आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून खेळताना त्याने ९१ कसोटीत ४३३ बळी टिपले. आफ्रिकेकडून कसोटीत सर्वाधिक कसोटी बाद करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. तो ताशी १५० च्या वेगाने गोलंदाजी करतो. २००८ ते २०१४ दरम्यान त्याने २६३ आठवडे सलग आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल राहण्याचा पराक्रम केला आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविद्धच्या मालिकेत त्याने चांगले प्रदर्शन केले आहे. २०१९ हा त्याचा शेवटचा विश्वचषक असू शकतो.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details