महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'हे' तीन भारतीय खेळाडू झळकवू शकतात कसोटीत त्रिशतक - कसोटीत क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकवू शकणारे फलंदाज

भारताचा माजी स्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवागने दोन वेळा त्रिशतक ठोकले आहे. सेहवागला सोडल्यास एकदा करुण नायरने त्रिशतकी खेळी केली आहे. आज घडीला त्रिशतकी खेळी करण्याची धमक या प्रमुख भारतीय संघातील खेळाडूंमध्ये आहे. वाचा कोण आहेत ते खेळाडू...

कसोटी त्रिशतक...'हे' तीन भारतीय खेळाडू झळकवू शकतात

By

Published : Oct 18, 2019, 4:09 PM IST

Updated : Oct 18, 2019, 7:38 PM IST

नवी दिल्ली - कसोटी क्रिकेटमध्ये शतकाचे रूपांतर द्विशतकात आणि द्विशतकाचे रुपांतर त्रिशतकात करणे, हा प्रवास वाटतो तेवढा सोपा नाही. त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागते. त्रिशतकाला परिश्रम तर लागतेच त्यासोबत एकाग्रता आणि भाग्याची साथ हवी असते. दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून आतापर्यंत दोन भारतीय खेळाडूंनी त्रिशतकी खेळी केली आहे.

भारताचा माजी स्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवागने दोन वेळा त्रिशतक ठोकले आहे. सेहवागला सोडल्यास एकदा करुण नायरने त्रिशतकी खेळी केली आहे. आज घडीला त्रिशतकी खेळी करण्याची धमक या प्रमुख भारतीय संघातील खेळाडूंमध्ये आहे. वाचा कोण आहेत ते खेळाडू...

विराट कोहली -
विराट कोहली सध्या भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. विराट कर्णधारपदासह फलंदाजीतही महत्वपूर्ण योगदान देतो. मायदेशातील खेळपट्ट्या असो की, विदेशात खेळपट्ट्या असो, तो आपल्या धाकड अंदाजात धावांचा पाऊस पाडताना दिसतो. यामुळेच तो आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी होता.

विराट कोहली...

काही दिवसांपूर्वीच विराटने पुण्यात झालेल्या आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यात नाबाद २५४ धावांची खेळी केली होती. महत्वाचे म्हणजे, या सामन्यात त्याला त्रिशतकी खेळी करण्याची संधी होती. मात्र, त्याने संघहिताला प्राधान्य देत डाव घोषित केला. विराटने आपल्या कसोटी कारकिर्दीत २६ शतके ठोकली आहेत. यात ७ द्विशतकाचा समावेश आहे. मात्र, विराटला अद्याप त्रिशतक झळकवता आलेले नाही.

रोहित शर्मा -
रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये पाचव्या-सहाव्या क्रमांकावर अयशस्वी ठरला. यामुळे रोहितला सलामीवीर म्हणून दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेत संधी देण्यात आली. या संधीचे सोने करत रोहितने दोनही डावात शतकं झळकावली. तसेच रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात ३ द्विशतक ठोकले आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. यामुळे रोहित शर्माने जर कसोटीतील ३-४ सत्रात फलंदाजी केली तर त्याला त्रिशतकी खेळी करण्यापासून रोखणं कोणत्याही गोलंदाजांना कठिण जाईल.

रोहित शर्मा...

मयांक अग्रवाल -
भारतीय कसोटी संघाचा दुसरा सलामीवीर मयांक अग्रवालने दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेत चांगल्या फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात २१५ धावांची खेळी केली. त्याच्या फलंदाजीचे कसब पाहून भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने त्यांची तुलना स्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवागशी केली होती. सध्या मयांक फुल्ल फॉर्मात आहे. यामुळे मयांकही त्रिशतकी खेळी करु शकतो.

मयांक अग्रवाल

हेही वाचा -कोलकाता कसोटीसाठी बांगलादेशी पंतप्रधान शेख हसिनांना निमंत्रण, मोदींची जबाबदारी गांगुलीवर

हेही वाचा -IPL 2020 : पहिल्यांदा घडलं! विराटची टीम आरसीबीत 'सुंदर' महिलेचा समावेश

Last Updated : Oct 18, 2019, 7:38 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details