महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'स्टायलिस्ट' विराट कोहली नाबाद '११'..लिहली भावनिक पोस्ट - विराट कोहली

विराट कोहलीसाठी १८ ऑगस्ट हा दिवस महत्वाचा दिवस आहे. कारण, ११ वर्षापूर्वी १८ ऑगस्ट २००८ ला श्रीलंका विरुध्द झालेल्या कसोटी सामन्यात त्याने पदार्पण केले होते. या सामन्यात विराटने माजी सलामीवीर गौतम गंभीर सोबत फलंदाजी केली होती. मात्र, विराट या सामन्यात केवळ १२ धावा करू शकला होता.

'स्टायलिस्ट' विराट कोहली नाबाद '११'..लिहली भावनिक पोस्ट

By

Published : Aug 19, 2019, 11:09 AM IST

नवी दिल्ली - भारतीय संघाचा 'स्टायलिस्ट' कर्णधार विराट कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. त्यामुळे त्याची क्रिकेट विश्वात रनमशीन अशी ओळख बनली आहे. तो सध्या आयसीसीच्या रॅकिंगमध्ये ८९५ गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. अशा हरहुन्नरी खेळाडूला आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करुन ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने त्याने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विराट कोहलीसाठी १८ ऑगस्ट हा दिवस महत्वाचा दिवस आहे. ११ वर्षांपूर्वी १८ ऑगस्ट २००८ ला श्रीलंका विरुध्द झालेल्या कसोटी सामन्यात त्याने पदार्पण केले होते. या सामन्यात विराटने माजी सलामीवीर गौतम गंभीर सोबत फलंदाजी केली होती. मात्र, विराट या सामन्यात केवळ १२ धावा करू शकला होता.

दरम्यान, आपल्या आंतरराष्ट्रीय दिवसाची आठवण काढत विराटने एक ट्विट केले आहे. त्यात त्याने दोन फोटो शेअर केले आहेत. या पोस्टसोबत त्याने, '२००८ मध्ये याच दिवशी तरुणावस्थेपासून सुरुवात केली. २०१९ च्या या आजच्या दिवशी ११ वर्षा पूर्ण झाली. मी स्वप्नातही असा विचार केला नव्हता देव मला अशी संधी देईल, असा मजकूरही त्याने सोबत लिहला आहे.

पहिल्या सामन्यात केवळ १२ धावांवर बाद झालेल्या विराटने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०,००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. विराटने २३९ एकदिवसीय सामन्यात ११ हजार ५२० धावा, ७७ कसोटीमध्ये ६ हजार ६१३ धावा आणि ७० टी-२० सामन्यामध्ये २३६९ धावा केल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details