महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'आतंकिस्तान' मध्ये क्रिकेट खेळणार नाही, श्रीलंकेच्या खेळाडूंचा पाक दौऱ्यासाठी नकार - lasith malinga

श्रीलंकेच्या खेळाडूंनी सुरक्षेचे कारण देत पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. या दौऱ्याला २७ सप्टेंबर पासून सुरुवात होणार होती. मात्र, लंकेच्या १० खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. याची माहिती श्रीलंका क्रिकेट संघटनेच्या अधिकाऱ्याने दिली.

'आतंकिस्तान' मध्ये क्रिकेट खेळणार नाही, श्रीलंकेच्या खेळाडूंचा पाक दौऱ्यासाठी नकार

By

Published : Sep 9, 2019, 11:46 PM IST

Updated : Sep 9, 2019, 11:52 PM IST

कोलंबो - श्रीलंकेच्या खेळाडूंनी सुरक्षेचे कारण देत पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. या दौऱ्याला २७ सप्टेंबर पासून सुरुवात होणार होती. मात्र, लंकेच्या १० खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. याची माहिती श्रीलंका क्रिकेट संघटनेच्या अधिकाऱ्याने दिली.

सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज, लसिथ मलिंगा, निरोशन डिकवेला, कुसल परेरा, धनंजय डिसिल्व्हा, सुरंगा लकमल, दिनेश चंडिमल, दिमुथ करुणारत्ने आणि अकीला धनंजया यांनी आपण पाकिस्तान दौऱ्यात सामील होणार नसल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा -"आत्तापर्यंत मी पाहिलेल्या फलंदाजांपैकी स्मिथच भारी"

श्रीलंकेचे क्रीडामंत्री हेरिन फर्नांडो दिलेल्या माहितीनुसार, अनेक खेळाडूंच्या कुटुंबीयांनी सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली होती. यावर त्यांना दिलासा देत संघाचे अधिकारी खेळाडूंची भेट घेतील आणि पाकिस्तान दौर्‍यासाठी तेथे त्यांना पूर्ण सुरक्षा देण्यात येईल, अशी सांगण्यात आले होते. मात्र आज अखेरीस या खेळाडूंनी आपण दौऱ्यात खेळणार नसल्यासाचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा -Ban vs Afg Test : अफगाणिस्तानच्या 'पठाणां'नी केली बांगलादेशी वाघांची शिकार

दरम्यान, २००९ मध्ये पाकिस्तानच्या लाहोर येथे श्रीलंकन खेळाडूच्या बसवर हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर खेळाडूंमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सुरक्षेचे कारण देत खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

Last Updated : Sep 9, 2019, 11:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details