मुंबई: आयपीएल 2020 चा उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मोठा धक्का बसला आहे. पंजाब किंग्ज विरुद्ध बुधवारी त्यांचा सामना आहे. परंतु सामन्यापूर्वी पुण्याचा प्रवास दिल्ली कॅपिटल्सला रद्द करावा लागला ( Delhi Capitals Pune tour canceled ) आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, रॅपिड अँटीजेन चाचणी (RAT) मध्ये खेळाडूला कोविड-19 ची लागण झाल्याचे आढळल्यानंतर, सोमवार आणि मंगळवारी होणाऱ्या RTPCR चाचणीपूर्वी संपूर्ण संघ क्वारंटाईनमध्ये राहील.
तसेच त्यांचा पुणे दौरा रद्द केल्यानंतर दिल्लीचा संघ मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये थांबला आहे. अहवालात असे म्हटले आहे की, कोविड चाचणी केल्यानंतर, अहवाल येईपर्यंत खेळाडूंना क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल.
याआधी शुक्रवारी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सांगितले की, दिल्लीचे फिजिओथेरपिस्ट पॅट्रिक फरहार्ट ( Physiotherapist Patrick Farhart ) यांना कोविड-19 ची लागण झाल्याचे आढळले आहे. रिलीझमध्ये म्हटले आहे की, दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोविड-19 ची लागण झाल्याचे आढळल्यानंतर डीसी वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहेत. अहवालात म्हटले आहे की, संघाच्या पुढील सामन्याबद्दल बीसीसीआयशी चर्चा केली जात आहे, विशेषत: बुधवारी एमसीए स्टेडियमवर होणारा पंजाब विरुद्धचा सामना आहे.
आयपीएल पॉइंट टेबलमध्ये ( IPL point table ), ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघ ( Delhi Capitals Team ) पाच सामन्यांतून तीन पराभवांसह आठव्या स्थानावर आहे. तसेच शनिवारी वानखेडे स्टेडियमवर त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) कडून 16 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
हेही वाचा -GT vs CSK, IPL 2022 : गुजरातचा चेन्नईवर तीन विकेट्सने विजय