मुंबई: आयपीएल स्पर्धेला शनिवारी सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात दिल्लीचा संघ ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. आगामी हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सला सर्व बाजूंनी पाठिंबा मिळत असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत भारताचा गोल्डन बॉय आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रानेही ( Gold medalist Neeraj Chopra ) दिल्ली संघ आणि त्यांचा कर्णधार ऋषभ पंतचे कौतुक केले आणि शुभेच्छी देखील दिल्या आहेत.
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( MI vs DC ) संघातील सामन्याला रविवारी दुपारी साडेतीन वाजता सुरुवात होणार आहे. त्या अगोदर दिल्ली कॅपिटल्सने नीरज चोप्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये नीरज चोप्राने दिल्लीची नवीन जर्सी घातली आहे आणि त्यादरम्यान त्याने म्हटले आहे की, 'दिल्ली कॅपिटल्स आणि ऋषभ भाई, कठोर परिश्रम आणि चांगले खेळत आहेत. यावेळी नक्कीच आयपीएल ट्रॉफी घेऊन या. दिल्लीच्या संपूर्ण संघाला आणि त्यांच्या खेळाडूंना माझ्या शुभेच्छा. याशिवाय हा व्हिडिओ अपलोड करताना दिल्ली कॅपिटल्सने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'नीरज चोप्राकडून डीसी कुटुंबासाठी एक सुवर्ण संदेश.