नवी दिल्ली : भालाफेकपटू नीरज चोप्राने फिटनेसच्या समस्येमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतली ( Neeraj Chopra out of Commonwealth Games ) आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) मंगळवारी ही माहिती दिली. चोप्राने रविवारी यूजीन येथील जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक रौप्य पदक जिंकले होते, परंतु स्पर्धेदरम्यान त्याच्या पायाच्या स्नायूंवर ताण ( Neeraj Chopra leg muscles strain )आला होता. आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता ( IOA General Secretary Rajiv Mehta ) यांनी सांगितले की, गत ऑलिम्पिक चॅम्पियन चोप्राला एक महिन्याच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
ते म्हणाले, "भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा ( Indian javelin thrower Neeraj Chopra ) याने आज सकाळी अमेरिकेतून माझ्याशी फोनवर चर्चा केली. तसेच तंदुरुस्तीच्या चिंतेमुळे बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होण्यास असमर्थता व्यक्त केली." मेहता यांनी सांगितले की, चोप्रा यांनी युजीन येथील जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतल्यानंतर सोमवारी एमआरआय केले आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने त्याला एक महिना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.