जोधपूर:काही दिवसापूर्वी आयपीएल स्पर्धेत नव्याने सहभागी झालेल्या लखनऊ जायंट्स संघाने रवि बिष्णोईला 4 कोटी रुपये देत आपल्या संघात सामिल करुन घेतले होते. त्यानंतर लगेच बुधावारी रवि बिष्णोईची भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे हा आनंद फिरकीपटू रवि बिष्णोईच्या (Spinner Ravi Bishnoi) घरच्यांनी केक कापून साजरा केला आहे.
तसेच या सेलिब्रेशनमध्ये रविचे कोच आणि खेळाडू सहभागी झाले होते. तसेच यामध्ये केक कापून तो रविच्या चेहऱ्याला लावून आनंद साजरा करण्यात आला. त्याचबरोबर त्याला शुभेच्छा देखील देण्यात आल्या. रवि बिष्णोईने फक्त तीन वर्षात अंडर-19 मधून भारतीय संघात सहभागी झाला आहे. जे कोणतेही स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे.
रवि विष्णोईची भारतीय संघात निवड झाल्याने त्याच्या गावी जल्लोश करण्यात आला प्रत्येक खेळाडू मैदानावर खेळायला उतरतो ना, तेव्हा त्याला फक्त एका गोष्टीचे वेध असते आणि ते म्हणजे आपल्या देशाच्या संघात प्रतिनिधित्व करण्याचे असते. जे आता रवि बिष्णोईचे पूर्ण झाले आहे. आता रविच्या जवळचे लोक म्हणत आहेत की, आमचे भाग्य आहे. आम्ही त्याच्या नावाने ओळखले जाऊ लागलो आहोत. तसेच रवि विष्णोई (Ravi Vishnoi will represent Indian team) लवकरच वेस्ट इंडीज विरुद्धच्या टी-20 आणि वनडे मालिकेत खेळण्यासाठी रवाना होणार आहे.
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करत रवि विष्णोईला शुभेच्छा (CM Ashok Gehlot congratulated Bishnoi) दिल्या आहेत. ज्यामध्ये ते म्हणाले आहेत की, 'जोधपूर, राजस्थानच्या रवि बिश्नोईला वेस्ट इंडीज विरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल अभिनंदन. त्याला माझ्या शुभेच्छा.'
21 वर्षीय रवि बिष्णोई हा फक्त 21 वर्षाचा आहे. त्याची पहिल्यांदाच भारताच्या वरिष्ठ संघात निवड करण्यात आली आहे. या अगोदर त्याने 19 वर्षाखाली संघाचे आणि आयपीएल स्पर्धेत पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आयपीएलच्या 23 सामन्यात 24 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच यंदाच्या हंगामात लखनऊ सुपरजायंट्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येणार आहे.