मुंबई:सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने बुधवारी जाहीर केले की, त्यांचा कर्णधार केन विल्यमसन त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी मायदेशी परतणार आहे. यामुळे विल्यमसन रविवारी वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध आयपीएल 2022 च्या शेवटच्या साखळी सामन्यात खेळू शकणार नाही. याबाबत सनरायझर्स हैदराबाद फ्रेंचायझीने ( Sunrisers Hyderabad ) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करुन माहिती दिली.
विल्यमसन मायदेशी परतन्यापूर्वी हैदराबादने मंगळवारी मुंबई इंडियन्सवर तीन धावांनी रोमहर्षक विजय मिळवून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, इतर संघांच्या सामन्यांच्या निकालावरही बरेच काही अवलंबून असेल. फ्रँचायझीने सांगितले की, आमचा कर्णधार केन विल्यमसन ( Captain Kane Williamson ) त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी न्यूझीलंडला परतणार आहे. आम्ही केन विल्यमसन आणि त्याच्या पत्नीला खूप खूप शुभेच्छा देतो.
विल्यमसनची पत्नी सारा रहीम ( Williamson wife, Sarah Rahim ) हिने डिसेंबर 2020 मध्ये एका मुलीला जन्म दिला होता, न्यूझीलंडच्या कर्णधाराने पितृत्व रजा घेतल्याने, वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी खेळू शकला नव्हता. विल्यमसनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर कॅप्शनसह एक फोटो पोस्ट केला होता, "आमच्या कुटुंबात एका सुंदर मुलीचे स्वागत करताना खूप आनंद झाला.
आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत, विल्यमसनने मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझीने कायम ठेवल्यानंतर 13 सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. पण स्पर्धात्मक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूची बॅट कोपरच्या दुखापतीतून सावरल्यानंतर शांत राहिली आहे. त्याने 19.64 च्या सरासरीने आणि 93.50 च्या स्ट्राईक रेटने फक्त 216 धावा केल्या आहेत. हैदराबाद सध्या 13 सामन्यांत 12 गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.
हेही वाचा -Wrestler Satender Malik : कॉमनवेल्थ गेम्सच्या चाचण्यांदरम्यान रेफ्रीला मारहान केल्या प्रकरणी, कुस्तीपटू सतेंदरवर आजीवन बंदी