हैदराबाद:मंगळवारी महिला T-20 चॅलेंज 2022 चा दुसरा सामना सुपरनोव्हाज आणि यांच्यात खेळला गेला. हा सामना व्हेलॉसिटी संघाने 7 विकेट्सने जिंकला. या सामन्यात माया सोनवणे देखील व्हेलॉसिटी संघात सामील झाली होती, जिच्या गोलंदाजीच्या अनोख्या अॅक्शनमुळे सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा सुरु आहे.
मायाची गोलंदाजी अॅक्शन ( Maya bowling action ) पाहून क्रिकेट चाहत्यांना दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर पॉल अॅडम्सची आठवण येऊ लागली आहे. पॉल अॅडम्सही त्याच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे खूप चर्चेत राहिला आहे. मायाची बॉलिंग अॅक्शन अशी आहे, की ती पाहून सगळेच हैराण झाले आहेत.
मात्र, तिला गोलंदाजीत काही अप्रतिम कामगिरी करता आली नाही. मायाच्या बॉलिंग अॅक्शनचे ( Maya sonawane Unique bowling action ) फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केले जात आहेत. मायाने दोन षटके टाकली आणि 19 धावा दिल्या.
23 वर्षीय मायाचा महिला टी-20 चॅलेंजमधील मंगळवारी पदार्पणाचा सामना होता. व्हेलॉसिटी नाणेफेक जिंकून सुपरनोव्हासला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. कर्णधार हरमनप्रीत कौरने 51 चेंडूत 71 धावांची शानदार खेळी केली. त्याचवेळी तानिया भाटियाने 32 चेंडूत 36 धावा केल्या. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर सुपरनोव्हाजला 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 151 धावाच करता आल्या.
हेही वाचा -Hardik Pandya Statement : माझे नाव नेहमीच विकले जाते, मला त्याचा त्रास नाही - हार्दिक पांड्या