महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Bhuvneshwar Kumar Statement : 'माझ्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनमध्ये कोणताही बदल झालेला नाही, मेहनतीमुळे मिळाले यश'

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ( Fast bowler Bhuvneshwar Kumar ) आपल्या यशाचे श्रेय गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनमध्ये कोणतेही बदल करण्यापेक्षा मेहनतीला दिले आहे. आज भारत आणि वेस्ट इंडिज संघात दुसरा टी-20 सामना खेळला जणार आहे.

Bhuvneshwar Kumar
भुवनेश्वर कुमार

By

Published : Aug 1, 2022, 4:41 PM IST

बासेटेरे (सेंट किट्स): भारत आणि वेस्ट इंडिज संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका ( West Indies vs India T20 Series ) खेळली जात आहे. या मलिकेतील दुसरा सामना सोमवारी बसेटेरे येथे होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी आठला सुरुवात होईल. 32 वर्षीय गोलंदाज भुवनेश्वर कुमार असे मानतो की गोलंदाजीवर बरेच काही अवलंबून असेल. कारण भारताचे लक्ष्य 1-0 ने आघाडीवरुन वेस्ट इंडिजविरुद्धची पाच सामन्यांची टी-20 मालिका जिंकण्याचे आहे.

भारतीय संघाचा अनभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारला जेव्हा विचारण्यात आले की, गेल्या काही महिन्यांत त्याने आपल्या गोलंदाजीत काही बदल केले आहेत का? तेव्हा त्याने उत्तर दिले की नाही मी फक्त मेहनत केली ( No change in my bowling action ) आहे.

तो म्हणाला, खरे सांगायचे तर मी माझी गोलंदाजी (कृती) बदललेली नाही. मी फक्त अधिक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न ( success came from hard work ) केला, ज्यामुळे माझे शरीर लयीत होते. यामुळे माझा आत्मविश्वास परत आला. फिटनेस ही अशी एक गोष्ट आहे ज्यामध्ये तुम्ही सुधारता, ते तुम्हाला मदत करते. गेल्या वर्षी आणि दक्षिण आफ्रिकेतील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्याने कोणताही प्रभाव पाडला नाही, ज्यामध्ये भारताचा 3-0 असा पराभव झाला.

बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये भुवी म्हणाला की, 'अर्थात जेव्हा तुम्ही संघासोबत असता तेव्हा तुम्ही सराव करता. पण मी घरी असतानाही माझ्या गोलंदाजीवर मेहनत घेतली आणि स्वत:ला सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगमध्ये ( Fast bowler Arshdeep Singh ) जबरदस्त क्षमता असल्याचेही गोलंदाजाने सांगितले. तरुण गोलंदाजाने असा विचार करणे चांगले आहे. 29 जुलै रोजी त्रिनिदाद येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात 24 धावांत दोन विकेट घेत अर्शदीपने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

भुवीला वाटले की अर्शदीपने आयपीएल संघासोबत चार वर्षे घालवली आहेत, पंजाब किंग्सने या उंच वेगवान गोलंदाजाला टीम इंडियासाठी खेळण्यासाठी परिपक्वता आणि आत्मविश्वास दिला आहे. तो म्हणाला, गेल्या दोन-तीन वर्षांपासून तो अव्वल स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्यामुळे, त्याला या खेळात किंवा त्या काळात काय साध्य करायचे आहे हे त्याला माहीत असते, ही मोठी गोष्ट आहे. त्याची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे काळजीपूर्वक नियोजन. पदार्पण केल्यापासून पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटचे स्वरूप खूप बदलले आहे, असेही भुवी म्हणाला.

हेही वाचा -Womens European Championship : इंग्लंडने जिंकली महिला युरो चॅम्पियनशिप; पहा, कसा केला लोकांनी जल्लोष

ABOUT THE AUTHOR

...view details