महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Ranji Trophy : क्रिकेटच्या इतिहासातील आश्चर्यकारक क्षण, 1 ते 9 क्रमांकाच्या फलंदाजांनी केल्या 50 पेक्षा जास्त धावा - 129 वर्षे जुना विक्रम मोडला

रणजी ट्रॉफीचे ( Ranji Trophy ) नाव जगभरात आदराने घेतले जाते. टीम इंडियात एंट्री मिळवण्यासाठी हा शेवटचा टप्पा मानला जातो. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत बुधवारी जे घडले ते आश्चर्यकारक-अविश्वसनीय आणि अकल्पनीय होते. आघाडीच्या नऊ फलंदाजांनी एका डावात 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

BENGAL
BENGAL

By

Published : Jun 9, 2022, 3:34 PM IST

बंगळुरू: रणजी ट्रॉफी 2022 च्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात, बंगालने झारखंडविरुद्ध विक्रमी फलंदाजी ( Bengal Record Breaking Batting Against Jharkhand ) करताना 7 बाद 773 अशी मोठी धावसंख्या करून डाव घोषित केला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत झारखंडचा निम्मा संघ प्रत्युत्तरात 139 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. बंगालसाठी क्रीजवर आलेल्या त्याच्या सर्व टॉप-9 फलंदाजांनी 50 पेक्षा जास्त धावा केल्या. डावाच्या अखेरीस सायन मोंडल आणि आकाश दीप यांनीही अर्धशतके पूर्ण केल्यानंतर 53-53 धावांवर नाबाद राहिले.

रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीच्या या सामन्यात बंगालने दोन फलंदाजांची शतके आणि सात फलंदाजांच्या अर्धशतकांच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात झारखंडला तिसऱ्या दिवसअखेर 5 बाद 139 धावा करता आल्या आणि बंगालने सामन्यावर पकड घट्ट ( Bengal Record Breaking Batting ) केली. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या नऊ फलंदाजांनी एका डावात 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी कधी पहिल्या आठ फलंदाजांनी प्रथम श्रेणी सामन्याच्या एका डावात किमान 50 धावा केल्या नाहीत.

129 वर्षे जुना विक्रम मोडला -

1893 साली प्रथम श्रेणी सामन्याच्या एका डावात किमान आठ फलंदाजांनी 50 पेक्षा जास्त धावा केल्याचं एकमेव उदाहरण आहे. जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या संघाने इंग्लंड दौऱ्यावर ऑक्स आणि कॅम्ब संघाविरुद्ध 843 धावा केल्या होत्या. त्यानंतर तब्बल 129 वर्षांनंतर ( 129-year-old record was broken ) भारताच्या सर्वात मोठ्या देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत हे पाहायला मिळाले. जेव्हा सर्व आघाडीच्या 9 फलंदाजांनी 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

अशी झाली होती सामन्याची अवस्था -

सलामीवीर अभिषेक रमन (61) आणि कर्णधार अभिमन्यू ईश्वरन (65) आणि अभिषेक पोरेल (68) यांच्या अर्धशतकाशिवाय सुदीप कुमार घारामी (186) आणि अनुस्तुप मजुमदार (117) यांनी सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी शतके झळकावली. बुधवारी तिसऱ्या दिवशी बंगालचे मंत्री आणि क्रिकेटपटू मनोज तिवारी (73), शाहबाज अहमद (78), सायन मंडल (नाबाद 53) आणि आकाश दीप (नाबाद 53) यांनीही आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर आकाश दीपने झटपट फलंदाजी करत 8 षटकार खेचले आणि अवघ्या 18 चेंडूत 53 धावा केल्या.

झारखंडकडून सुशांत मिश्राने 140 धावांत तीन, तर शाहबाज नदीमने 175 धावांत दोन बळी घेतले. पहिल्या डावात खेळण्यासाठी उतरलेल्या झारखंडने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 139 धावांत पाच गडी गमावले होते. सलामीवीर नाझिम सिद्दीकी ( Opener Nazim Siddiqui ) (53) केवळ फलंदाजी करू शकला. कर्णधार सौरभ तिवारीने 33 धावांचे योगदान दिले. यष्टीमागे विराट सिंग 17, तर अनुकुल रॉय एक धाव घेत खेळत होता. बंगालकडून सयान मोंडलने 32 धावांत तीन, तर शाहबाज अहमदने पाच धावांत दोन गडी बाद केले. फॉलोऑन टाळण्यासाठी झारखंडच्या संघाला अजूनही 435 धावांची गरज आहे.

या विक्रमाने बंगाल क्रिकेटमधील माजी महान खेळाडूं उत्साहित झाले. संबरन बॅनर्जी, अरुण लाल आणि अशोक मल्होत्रा ​​यांनी 1989-90 मध्ये शेवटचे रणजी विजेतेपद जिंकण्यासाठी बंगालमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. बॅनर्जी कर्णधार होते, लाल आणि मल्होत्रा ​​यांनी प्रतिष्ठित ट्रॉफी घरी आणण्यासाठी चांगले योगदान दिले होते. बंगालचे प्रमुख अरुण लाल यांनी त्यांचे कौतुक केले.

हेही वाचा -Joe Root Bat Video : सोशल मीडियावर जो रुटचा 'हा' व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details