दुबई - आयसीसी टी 20 विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन पुढील महिन्यात यूएई आणि ओमानमध्ये करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण आज करण्यात आले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत याची माहिती दिली. दरम्यान, बीसीसीआय या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे.
टी 20 विश्वकरंडक स्पर्धेची सुरूवात 17 ऑक्टोबरपासून होणार आहे. या स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. यावेळी एच. इ. शेख, नाहयान मुबारक अल नहयान, खालीद अल जरुनी यांच्यासह आयसीसीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
जय शाह यांनी ट्विट करत याची माहिती दिली. ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, एच. इ. शेख, नाहयान मुबारक अल नहयान, खालिद अल जरुनी आणि आयसीसीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दुबईत टी 20 विश्वकरंडक स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. अमिरात क्रिकेट भारतासाठी, आगामी टी 20 विश्वकरंडक स्पर्धेमुळे दुसरे घर असल्यासारखं आहे.