महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Ajit Agarkar New Chief Selector: अजित आगरकर यांची टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती, बीसीसीआयने केले जाहीर - चेतन शर्मा

बीसीसीआयने टीम इंडियाचे नवे मुख्य निवडकर्ता म्हणून भारताचा माजी अष्टपैलू अजित आगरकर यांची नियुक्ती जाहीर केली आहे. गेल्या ५ महिन्यांपासून हे पद रिक्त होते. अजित आगरकर यांनी माजी मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांची जागा घेतली आहे.

Ajit Agarkar
अजित आगरकर

By

Published : Jul 5, 2023, 7:00 AM IST

Updated : Jul 5, 2023, 7:11 AM IST

नवी दिल्ली : भारताचा माजी स्टार अष्टपैलू अजित आगरकर हे टीम इंडियाचा नवे मुख्य निवडकर्ते झाले आहेत. बीसीसीआयने मंगळवारी रात्री एक प्रेस ब्रीफ जारी करून आगरकरची मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती जाहीर केली. आगरकरने दिल्ली कॅपिटल्समधून वेगळे झाल्यापासून त्यांना टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता बनवण्याची शक्यता वर्तवली जात होती. यापूर्वी ते दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग स्टाफचा भाग होते, परंतु काही दिवसांपूर्वी ते संघापासून वेगळे झाले होते.

अजित आगरकर यांची एकमताने शिफारस : भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांना स्टिंग ऑपरेशनमध्ये पकडल्यानंतर पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर गेल्या ५ महिन्यांपासून हे पद रिक्त होते. पण आता सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा ​​आणि जतीन परांजपे यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने पुरुष निवड समितीमधील निवडक पदासाठी अर्जदारांची मुलाखत घेतली. तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने या पदासाठी अजित आगरकर यांची एकमताने शिफारस केली.

एकूण खेळलेले सामने : भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर यांनी 26 कसोटी, 191 एकदिवसीय आणि 4 टी-20 मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले याशिवाय 110 प्रथम श्रेणी, 270 लिस्ट ए आणि 62 टी-20 सामने खेळले. माजी वेगवान गोलंदाज म्हणून, तो 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या उद्घाटन टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयी संघाचा भाग होता. एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये भारतीय फलंदाजाने सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम आगरकरच्या नावावर आहे.

पुरुष निवड समिती :2000 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात त्यांनी 21 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. आगरकरने जवळपास एका दशकात सर्वात जलद 50 एकदिवसीय विकेट्स घेण्याचा विक्रमही नोंदवला आणि केवळ 23 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. त्यांच्या खेळाच्या कारकिर्दीनंतर, आगरकरची मुंबईच्या वरिष्ठ संघासाठी मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली क्रिकेट सल्लागार समितीने ज्येष्ठतेच्या आधारावर (एकूण कसोटी सामन्यांची संख्या) पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी आगरकरची शिफारस केली. पुरुष निवड समितीमध्येअजित आगरकर (अध्यक्ष), शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला, श्रीधरन शरथ हे आहेत.

हेही वाचा :

  1. ICC World Cup 2023 : दोन वेळच्या चॅम्पियन वेस्ट इंडिजवर मोठी नामुष्की, स्कॉटलंडविरुद्ध पराभवासह वर्ल्ड कपमधून बाहेर
  2. Team India Sponsor : टीम इंडियाच्या नवीन स्पॉन्सरची घोषणा, आता जर्सीवर दिसणार 'या' कंपनीचा लोगो
  3. MPL 2023 : रत्नागिरी जेट्स महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 चे विजेते, पावसाने केला कोल्हापूरचा गेम
Last Updated : Jul 5, 2023, 7:11 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details