दुबई: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Pakistan captain Babar Azam) याला सोमवारी 2021 सालचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ खेळाडू (The best players in ODI cricket) म्हणून घोषित करण्यात आले आहे. आझमने बांगलादेशचा शाकिब अल हसन, दक्षिण आफ्रिकेचा जेनेमन मलान आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग यांना मागे टाकत या पुरस्कारवर आपले नाव कोरले आहे. याआधी, आयसीसी पुरस्कारांच्या या मोसमात, आझमची 2021 च्या पुरुष एकदिवसीय आणि टी-20 संघाचा कर्णधार म्हणून देखील निवड करण्यात आली होती.
यावर प्रतिक्रिया देताना बाबर आझम म्हणाला, सर्वप्रथम मला पाठिंबा दिल्याबद्दल आणि मला मत दिल्याबद्दल मी चाहत्यांचा खुप आभारी आहे. त्यानंतर मी पीसीबी (Pakistan Cricket Board ), आयसीसी (International Cricket Council) आणि विशेषत: माझ्या पाकिस्तान संघाने पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे. त्यांच्याशिवाय हे यश शक्य नव्हते. तसेच इतका चांगला संघ मिळाल्याचा मला अभिमान वाटतो. मी माझ्या पालकांचा देखील आभारी आहे, ज्यांनी (माझ्या यशासाठी) खूप प्रार्थना केली.