मेलबर्न - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अॅरोन समर्सला लहान मुलांचे शोषण केल्याच्या आरोपाखाली गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. आज त्याला डार्विन कोर्टात हजर करण्यात आले.
२५ वर्षीय समर्सने पोलिसांसमवेत स्थानिक न्यायालयात हजेरी लावली. समर्सच्या मोबाइल फोनमध्ये लहान मुलांचे शोषण केल्याचे व्हिडिओ आहेत.
नॉर्दर्न टेरिटरीज पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, समर्स असे बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी अनेक मुलांशी संपर्क साधत होता. समर्सच्या मोबाइलमध्ये अत्याचाराचे अनेक व्हिडिओ आहेत. आणखी असे अश्लील फोटो घेण्यासाठी समर्स १० मुलांशी संपर्कात असल्याचा पुरावाही आहे. कोर्टाकडून लवकरच याप्रकरणी आपला निर्णय जाहीर होणे अपेक्षित आहे.