बेंगलोर : आयपीएल 2022 (Indian Premier League 2022) च्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्या अगोदर आयपीएल 2022 साठी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. हा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरु येथे होणार आहे. या लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल संघाचे सहाय्यक प्रशिक्षक प्रविण आमरे यांनी मोठी भविष्यवाणी केली (Praveen Amre big prediction) आहे.
सहाय्यक प्रशिक्षक प्रविण आमरे म्हणाले, 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरु येथे होणारा मेगा लिलाव (A mega auction in Bangalore) हा अत्यंत स्पर्धात्मक असणार आहे. फ्रेंचायझीला यासाठी चांगल्या प्रकारे तयार रहावे लागेल. जसे की आपण हाई प्रेशर सामन्यासाठी तयार राहतो. आयपीएल स्पर्धा जशी जवळ येत आहे, तशी या मेगा इव्हेंटच्या तयारीत दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals Team) कोणतीही कसर सोडत नाहीये. दोन नवीन संघ सहाभागी झाल्याने ही प्रतिस्पर्धा खुपच कठीण झाली आहे. त्यामुळे संघाना फक्त प्लॅन बी नाही, तर प्लॅन सी आणि डी सोबत तयार रहावे लागणार आहे.
आमरे म्हणाले, दोन नवीन संघ जोडले गेल्याने हा मेगा लिलाव नेहमी प्रमाणे आव्हानात्मक असणार झाला आहे. आम्हाला माहित आहे की काही फ्रँचायझींकडे जास्त पैसे असतील आणि तेव्हा सर्व कौशल्य आणि सर्व लिलावाचा अनुभव गिनला जाईल.