हांगझोऊ :श्रीलंकेच्या मधल्या फळीतील फलंदाज हसिनी परेरा (25) आणि निलाक्षी डी सिल्वा (23) यांनी सुरेख खेळी करत श्रीलंकेला विजयाच्या उंबरठ्याजव पोहोचण्यास मदत केली. मात्र, भारतीय महिला गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेच्या विजयाचं स्वप्न धुळीस मिळालं.
प्रथम फलंदाजी करताना स्मृती आणि जेमिमाह यांनी अनुक्रमे 46 आणि 42 धावा करून धावांचा डोंगर रचला. जेमिमाह रॉड्रिग्जनेही 40 चेंडूत 42 धावांचे योगदान दिले. शेफाली वर्मा 9 धावांवर लवकर बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौरलाही केवळ 2 धावा करता आल्या. शेफाली वर्मा आणि जेमिमा यांनी ७३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केल्यानं भारतीय संघ 116 धावांपर्यंत पोहोचला.
- भारताच्या वेगवान गोलंदाज साधूनं चार षटकांत ६ धावा देत श्रीलंकेचे तीन विकेट घेऊन श्रीलंकेला शरणागती पत्करायला लावली. राजेश्वरी गायकवाडने दोन बळी घेत भारताचा विजय सुकर केला. दीप्ती शर्मा, देविका वैद्य आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
- राजेश्वरीनं अखेरच्या षटकात केलेल्या गोलंदाजीनं भारताला विजय मिळवून दिला. राजेश्वरी गायकवाडने शेवटच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी करत कुमारीला त्रिफळाचीत केले. राजेश्वरीने 1 धाव देत भारताला 19 धावांनी विजय मिळवून दिला. यासह भारतीय महिला संघाने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. देविका वैद्यनं श्रीलंकेच्या फलंदाजांना आक्रमक होण्याची संधी दिली नाही. देविकानं 19व्या षटकात 5 धावा दिल्या आहेत. यासोबतच देविकानं 5 धावांच्या स्कोअरवर कविशा दिलहरीला रिचा घोषच्या हातून बाद केले.