महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Maxwell Wedding Function : वेडिंग फंक्शनमध्ये 'ऊं अंटावा' गाण्यावर विराटने धरला ठेका; अनुष्का शर्माने शेअर केले फोटो - आयपीएलच्या बातम्या

अनुष्का शर्माने ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेलच्या लग्नाच्या पार्टीतील ( Maxwell Wedding Party ) पती विराट कोहलीसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

virat anushka
virat anushka

By

Published : Apr 28, 2022, 4:46 PM IST

Updated : Apr 28, 2022, 6:04 PM IST

हैदराबाद :बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Bollywood Actress Anushka Sharma ) सध्या पती आणि क्रिकेटर विराट कोहलीसोबत आयपीएलमध्ये मस्ती करत आहे. पती विराटच्या संघाचे सामने पाहण्यासाठी अनुष्का स्टेडियममध्ये जात आहेत. या दरम्यान, अनुष्काने एका लग्न समारंभालाही हजेरी लावली होती. अभिनेत्रीने तिथले काही फोटो शेअर केले आहेत. हे फंक्शन ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेलच्या लग्नाचे ( Glenn Maxwell Wedding Function ) आहे. मॅक्सवेलने नुकतेच विनी रमन या भारतीय मुलीशी लग्न केले. या पार्टीत अनुष्का-विराटही पोहोचले. या फंक्शनमध्ये विराटने ( Virat Kohli ) पुष्पा चित्रपटातील 'ऊं अंटावा' या सुपरहिट आयटम साँगवरही डान्स केला.

अनुष्का शर्माने या पार्टीचे दोन सुंदर फोटो शेअर केले आहेत. या पार्टीत अनुष्का आणि विराट पारंपारिक लूकमध्ये पोहोचले होते. फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की अनुष्काने पिंक कलरचा सूट घातला आहे आणि विराटने ब्लू कलरचा कुर्ता आणि व्हाइट कलरचा पायजमा घातला आहे.

अनुष्का-विराट

ही छायाचित्रे शेअर करत अनुष्काने लिहिले आहे की, 'लग्नाचे फंक्शन बबलमध्ये, आता मला वाटत आहे की, मी बबलमध्ये प्रत्येक फंक्शन सेलिब्रेट केले'. कोविड-19 मुळे, खेळाडूंना अजूनही बबलमध्ये सुरक्षेत ठेवण्यात आले आहे. आता अनुष्काच्या या पोस्टवर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत या जोडीवर प्रेमाचा वर्षाव होत आहे.

अनुष्का-विराट

अनुष्का शर्माचा वर्कफ्रंट -अनुष्का शर्मा पुन्हा एकदा पडद्यावर कमबॅक करत आहे. 'चकदा एक्स्प्रेस' या चित्रपटातून ती धमाल करायला सज्ज झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री भारतीय महिला क्रिकेट संघाची दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामीची भूमिका ( Role of Jhulan Goswami ) साकारणार आहे. अनुष्का या चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहे आणि ती तिच्या सरावाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. अनुष्का शेवटची शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबत 'झिरो' (2018) चित्रपटात दिसली होती.

हेही वाचा -Chris Lynn Statement : उमरान मलिकला टी-20 विश्वचषकात खेळताना बघायला आवडेल - क्रिस लिन

Last Updated : Apr 28, 2022, 6:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details