चेन्नई : आयपीएल 2023 चा एलिमिनेटरच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने लखनऊ सुपर जायंट्सचा दारुण पराभव केला. या विजयासह मुंबई पलटणने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले आहे. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम या स्टेडियम झालेल्या सामन्यात मुंबईच्या संघाने लखनऊसमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य लखनऊचे नबाब सहजगत्या पार करतील असे वाटले होते. कारण या हंगामात लखनऊकडून मुंबईला नेहमी पराभव मिळत होता. सहज वाटणारे आव्हान पार करणे लखनऊच्या संघाला कठीण झाले. याचे कारण ठरला मुंबईचा दुसरा स्काय, म्हणजे आकाश मढवाल.
आकाशने घडवला इतिहास : आकाश मढवालने अवघ्या पाच धावांमध्ये 5 विकेट्स मिळवल्या. आतापर्यंत अशी कामगिरी आयपीएलच्या इतिहासात कोणालाही करता आली नव्हती. आकाशने 3.3 ओव्हरमध्ये पाच धावा देत पाच गडी बाद केले. अनकॅप बॉलरची आयपीएल इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरीच्या यादीत आकाश पाचव्या क्रमांकावर आला आहे.
याआधी या गोलंदाजांनी केला करिष्मा : यापूर्वी अल्झारी जोसेफने मुंबईकडून खेळताना 12 रनवर 6 विकेट घेतल्या होत्या. ही कामगिरी आजही सर्वोत्तम आहे. तर सोहेल तनवीरने सीएसकेविरुद्ध 14 रनवर 6 विकेट, एडम झम्पाने हैदराबादविरुद्ध 19 रनवर 6 विकेट तर अनिल कुंबळेनेही राजस्थानविरुद्ध 5 रन देऊन 5 विकेट घेतल्या होत्या. वरुण चक्रवर्तीने दिल्लीविरुद्ध 20 धावा देत 5 गडी बाद केले होते. तर उमरान मलिकने गुजरातविरुद्ध 25 रन देऊन 5 गडी बाद केले होते.
प्ले-ऑफच्या खेळात जबरदस्त कामगिरी : आयपीएल प्ले-ऑफच्या इतिहासातली आकाशची ही सर्वोत्तम कामगिरी. उत्तराखंडकडून आयपीएल खेळणारा तो पहिलाच खेळाडू आहे. दरम्यान डग बॉलिंगरने 2010 सालच्या सेमी फायनलमध्ये 13 रनवर 4 विकेट, जसप्रीत बुमराहने 2020 च्या क्वालिफायर1 मध्ये 14 रनवर 4 विकेट, तर धवल कुलकर्णीने 2016 च्या क्वालिफायर1 मध्ये 14 रनवर 4 विकेट घेतल्या होत्या. पण आकाश हा अनकॅप खेळाडू आहे. तरीही त्याने इतकी चमकदार कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आकाशने आपल्या 3.3 षटकात फक्त 5 धावा देत 5 गडी बाद केले. मागील 4 सामन्यामध्ये त्याने 12 विकेट्स घेतल्या आहेत.
कोण आहे आकाश :खरेतर आकाशला आयपीएलच्या मैदानात आणले आरसीबीने आणले होते. आरसीबीने त्याच्यावर मेहनत घेतली. पण त्याला संधी मात्र दिली नाही. पण मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याच्यातील गुण पाहिले आणि त्याला संधी दिली. मढवाल हा ऋषभ पंतचा शेजारी राहणारा आहे. हो धांडेरामधील रुरकी गावात ऋषभ पंत आणि आकाश शेजारी होते. आकाशने इंजिनिअरींचे शिक्षण पूर्ण केले आहे. क्रिकेट आपला छंद मानणारा आकाशने आज नवा इतिहास घडवला आहे. अवतार सिंग यांनी आकाशला क्रिकेटचे धडे दिले आहेत. अवतार यांनी ऋषभ पंतला देखील क्रिकेट शिकवत होते. आकाश हा उत्तराखंड रणजी ट्रॉफीमध्ये खेळ नव्हता. तो फक्त टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळत असायचा. पंरतु त्या क्रिकेटमध्येही तो एक दहशत होता, असे अवतार सिंग म्हणतात.