नवी दिल्ली:जगातील सर्वात मोठी टी-20 लीग आयपीएल 2022 स्पर्धेला शनिवारी सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडू बरोबरच विदेशी खेळाडू देखील सहभागी होतात. ज्यामध्ये अफगानिस्तानच्या खेळाडूंचा देखील समावेश असतो. अफगाणिस्तानच्या ज्यादातर क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळायचे होते, परंतु स्टार अष्टपैलू रशीद खानसह केवळ सहा खेळाडूंना संधी मिळाली आहे. तसेच ते आयपीएल 2022 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत.
राशिद खान (गुजरात टायटन्स) - राशिद खान (Spinner Rashid Khan ) गुजरात टायटन्स या नवीन फ्रँचायझीमध्ये सहभागी झाल आहे. तो संघातील महत्त्वाचा खेळाडू मानला जातो, राष्ट्रीय संघाचा माजी कर्णधार हा आयपीएल 2022 चा सर्वात महागडा अफगाण खेळाडू आहे. गुजरात टायटन्सने त्याला 15 कोटींमध्ये खरेदी केले. राशिदने आतापर्यंत ७६ आयपीएल सामने खेळले असून 6.33 च्या इकॉनॉमी रेटने 93 बळी घेतले आहेत.
नूर अहमद (गुजरात टायटन्स) - फ्रँचायझीमध्ये राशिद खान सोबत 17 वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज नूर अहमद ( Spinner Noor Ahmed ) याचाही समावेश आहे. जो आयपीएल 2022 मधील सर्वात तरुण खेळाडू आहे. नूरचे अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले नाही. परंतु गुजरात टायटन्सने त्याला 30 लाख रुपयांमध्ये खरेदी केले आहे.
रहमानउल्ला गुरबाज (गुजरात टायटन्स) - गुजरात टायटन्सने जेसन रॉयच्या जागी अफगाणिस्तानचा आणखी एक खेळाडू रहमानउल्ला गुरबाजला ( Rahmanullah Gurbaj ) करारबद्ध केले आहे. वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडचा स्टार खेळाडू जेसनने आयपीएल 2022 मधून माघार घेतली. त्यानंतर 20 वर्षीय खेळाडूने राशिद खान आणि नूर अहमद यांच्यासह गुजरात टायटन्समध्ये प्रवेश केला. गुरबाज 2021 मध्ये अबूधाबी येथे आयर्लंडविरुद्धच्या त्याच्या वनडे पदार्पणात शतक झळकावल्यानंतर प्रकाशझोतात आला होता. ही कामगिरी करणारा तो पहिला अफगाण क्रिकेटपटू ठरला. उजव्या हाताचा यष्टीरक्षक-फलंदाज, गुरबाजने 2018 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व केले. 2019 मध्ये त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाल्यापासून, त्याने आतापर्यंत नऊ एकदिवसीय आणि 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत