महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : कर्णधार रोहित शर्माची धोनीशी तुलना होऊ शकत नाही; पाहा कोण म्हणाले... - 2023 Cricket World Cup

2023 Cricket World Cup : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्यापासून सुरू होणाऱ्या ICC क्रिकेट विश्वचषक 2023 च्या आधी, ETV इंडियाचे राजेश कुमार सिंग यांनी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे शाळेचे प्रशिक्षक केशव रंजन बॅनर्जी यांच्याशी खास बातचीत केलीय.

2023 Cricket World Cup
2023 Cricket World Cup

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 6:42 PM IST

Updated : Oct 4, 2023, 6:51 PM IST

केशव रंजन बॅनर्जी

रांची (झारखंड):महेंद्रसिंग धोनीचे बालपणीचे प्रशिक्षक केशव रंजन बॅनर्जी यांनी म्हटलं की, भारताचा कर्णधार रोहित शर्मा खूपच परिपक्व आहे, पण त्याच्या कर्णधारपदाच्या शैलीची तुलना महान खेळाडू एमएस धोनीशी होऊ शकत नाही. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली, भारतानं तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतील पहिला T20 विश्वचषक, 2011 मध्ये आयसीसी वनडे क्रिकेट विश्वचषक, 2013 मध्ये इंग्लंडमध्ये आयोजित केलेला ICC चॅम्पियन्सचा समावेश आहे.

धोनीशी तुलना होऊ शकत नाही :केशव रंजन बॅनर्जी म्हणाले की, महेंद्रसिंग धोनी सारखं संघाचं नेतृत्व क्वचितच कोणत्याही (इतर) भारतीय क्रिकेटपटूमध्ये दिसून येतं. "धोनी प्रत्येक खेळाडूला समजून घ्यायचा. मग तो गोलंदाजाला त्यानुसार गोलंदाजी करायला सांगायचा. रोहित शर्माही खूप परिपक्व आहे, पण त्याच्या कर्णधार क्षमतेची महेंद्रसिंग धोनीशी तुलना होऊ शकत नाही, असं केशव रंजन बॅनर्जी यांनी ईटीव्ही भारताला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.

भारतीय संघ अतिशय अचूक :यावेळी केशव रंजन बॅनर्जी म्हणाले की, भारतीय संघ अतिशय अचूक आहे. मात्र, दुखापतीमुळं बाहेर असलेला डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलची कमतरता संघाला जाणवणार आहे. त्यांच्या मते अक्सर पटेलला चांगली फलंदाजी करता आली. निवडक खेळाडूंना अशा प्रसंगी दुखापत होऊ नये, म्हणून बीसीसीआयनं या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या होत्या, असं ते म्हणाले. झारखंडचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनचा भारतीय संघात समावेश झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुलसह फलंदाजांबद्दलही मत व्यक्त केले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत कोणत्या दोन संघांमध्ये स्पर्धा होण्याची शक्यता आहे, असं विचारले असता ते म्हणाले की, "भारत आणि इंग्लंड" संघात अंतिम स्पर्धा होण्याची शक्यता आहेत.

भारत तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकणार : घरच्या मैदानावर खेळणं अनेक प्रकारे फायदेशीर आहे, पण त्यामुळं खेळाडूंवर दबावही निर्माण होतो, असंही ते पुढे म्हणाले. "रोहित शर्माला दबावाचा सामना करावा लागेल. भारतानं 1983 मध्ये कपिल देव, 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला. पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे." पाचवेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाबाबत ते म्हणाले की, अंतिम फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होण्याची दाट शक्यता आहे. भारत तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकू शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -

  1. Cricket World Cup 2023 : विश्वचषकाचा भव्य उद्घाटन सोहळा रद्द, सर्व संघांच्या कर्णधारांचं फोटो सेशन होईल
  2. Cricket World Cup 2023 : लहानपणी अभ्यासाऐवजी केली क्रिकेटची निवड, आज विश्वचषक संघातील महत्वाचा खेळाडू आहे इशान किशन
  3. Cricket World Cup 2023 : पाचवेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा विजेतेपदाचा दावेदार, जाणून घ्या संघाची ताकद आणि कमजोरी
Last Updated : Oct 4, 2023, 6:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details