कोलकाता - सध्या वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर ( West Indies tour of India ) आहे. या दौऱ्यात वनडे आणि टी-20 मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी वनडे मालिका पार पडली आहे. ज्यामध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजला 3-0 ने अशा फरकाने व्हाईट वॉश दिला होता. त्यानंतर या दोन्ही संघात कोलकाता येथे बुधवार (16 फेब्रुवारी) पासून टी-20 मालिकेला सुरुवात होत आहे.
टी- 20 मालिकेसाठी भारत आणि वेस्ट इंडिज संघातील खेळाडूंनी मागील दोन दिवसात नेटमध्ये घाम गाळला आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Former Indian captain Virat Kohli ) सपशेल अपयशी ठरला होता. या मालिकेत त्याच्या बॅटमधून धावा निघतील अशी अपेक्षा सर्वांना असणार आहे. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जशी वनडे मालिका जिंकली, तशी टी-20 मालिका देखील जिंकण्याचा भारतीय संघाचा मानस असणार आहे. परंतु हे आव्हान थोडे अवघड असणार आहे.
कारण मागील दौऱ्यात वेस्ट इंडिज संघाने इंग्लंडला टी-20 मालिकेत 3-2 ने धूळ चारली होती. त्यामुळे भारतीय संघासाठी ही टी-20 मालिका आव्हानात्मक ( T20 series challenging for India ) असणार आहे. तसेच क्रिकेटचा टी-20 हा फॉरमॅट वेस्ट इंडिज संघाचा विशेष आवडता फॉरमॅट आहे. त्यामुळे ही मालिका रंगतदार होणार यामध्ये काही शंका नाही.
दरम्यान तीन दिवसापूर्वी आयपीएलच्या 15 व्या पर्वाचा मेगा लिलाव ( Mega auction 15th edition of IPL ) पार पडला होता. ज्यामध्ये युवा भारतीय खेळाडूंवर चांगली बोली लागली होती. तसेच लिलावात धमाकेदार बोली लागले युवा खेळाडू सध्या भारतीय संघात आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे. पहिल्या टी-20 सामन्याला आज (16 फेब्रुवारी) संध्याकाळी सात वाजता सुरु होईल.