बँकॉक - कोरोनामुळे जवळपास १० महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांना सुरुवात होत आहे. भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या आजपासून (मंगळवार) सुरू होणाऱ्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून वापसी करणार आहेत. त्यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा आहेत.
थायलंड ओपन स्पर्धेतून जपान आणि चीनने माघार घेतली आहे. यामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे. थायलंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने चीनने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर दुसरीकडे जगातील अव्वल मानांकित खेळाडू केंटो मोमोटा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. जपानने यामुळे अखेरच्या क्षणी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.