क्वालालंपूर - भारताचा बॅडमिंटन खेळाडू किदम्बी श्रीकांतला मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उंपात्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. या पराभवासह श्रीकांतला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे.
मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत श्रीकांतचा पराभव, भारताचे आव्हान संपुष्टात
यापूर्वी एचएस प्रणॉयला आणि समीर वर्माला पराभवाचा धक्का बसल्याने ते यापूर्वीच स्पर्धेबाहेर पडले आहेत
किदम्बी श्रीकांत
४८ मिनीटे चाललेल्या उंपात्यपूर्व सामन्यात चीनच्या चेन लोंगने श्रीकांतवर २१-१८, २१-१९ असा संघर्षपूर्ण विजय मिळवत उंपात्य फेरी गाठली आहे. श्रीकांतच्या या पराभवासह भारताचे पुरुष एकेरीत विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे.
या स्पर्धेत यापूर्वी एचएस प्रणॉयला आणि समीर वर्माला पराभवाचा धक्का बसल्याने ते यापूर्वीच स्पर्धेबाहेर पडले आहेत. तर महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवालचा यांचा पराभव झाल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.