नवी दिल्ली -भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आज बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत सायनाने पक्षात प्रवेश केला.
हेही वाचा -इरफानच्या 'त्या' कारनाम्याला आज १४ वर्षे पूर्ण झाली!

जागतिक क्रमवारीत अव्वल राहिलेल्या सायनाला राजीव गांधी खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे. सायनाच्या नावावर 22 सुपर सिरीज आणि ग्रँड प्रिक्स जेतेपदे आहेत. याव्यतिरिक्त, २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदक जिंकले होते. बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली.
कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि बबिता फोगट हेदेखील भाजपमध्ये दाखल झाले आहे.