नवी दिल्ली - इंडोनेशिया ओपनची उपविजेती पी. व्ही. सिंधूने थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. या माघारीचे कारण कळू शकले नाही. त्यामुळे, आता सर्वांच्या नजरा भारताची फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायना नेहवालवर लागल्या आहेत.
थायलंड ओपन : भारताची फुलराणी स्पर्धेत 'इन' तर सिंधू 'आऊट' - साई उत्तेजिता
काही दिवसांवर आलेल्या या स्पर्धेच्या मुख्य फेरीमध्ये सायना महिला एकेरीचे नेतृत्व सांभाळणार आहे.
काही दिवसांवर आलेल्या या स्पर्धेच्या मुख्य फेरीमध्ये सायना महिला एकेरीचे नेतृत्व सांभाळणार आहे. सायनाला सलगच्या दोन स्पर्धांना दुखापतीमुळे मुकावे लागले होते. वर्षाच्या प्रारंभी झालेल्या इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेत सायनाने उपविजेतेपद मिळवले होते. पुरुष एकेरीमध्ये किदम्बी श्रीकांत, बी साईप्रणीत, एच एस प्रणॉय आणि पारुपल्ली कश्यप हे भारताचे खेळाडू आव्हानासाठी सज्ज असणार आहेत.
दुसरीकडे, फायनल फोबियाच्या गर्तेत सापडलेल्या सिंधूने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. इंडोनेशिया ओपनच्या अंतिम सामन्यात आणि जपान ओपनच्या उपांत्यफेरीत जपानच्या अकाने यामागुचीनेच पराभूत केले होते. पात्रता फेरीत, भारताच्या सौरभ वर्मा आणि महिलांमध्ये साई उत्तेजिताने मुख्य फेरी गाठली असून अजय जयराम मात्र मुख्य फेरी गाठण्यात अपयशी ठरला. झो क्यूनेच जयरामला २१-१६, २१-१३ अशी धूळ चारली.