महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सिंगापूर ओपन बॅडमिंटन: पी. व्ही. सिंधूच्या पराभवासह भारताचं आव्हान संपुष्टात - losses

विजेतेपदासठी नोजोमी ओकुहारा भिडणार तैवानच्या ताय झू यिंगशी

पी. व्ही. सिंधू

By

Published : Apr 13, 2019, 7:06 PM IST

सिंगापूर - भारताची बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधूला सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या सेमीफायनलमध्ये पराभवाचा धक्का बसला आहे. सिंधूच्या या पराभवामुळे भारताला या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला असून विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.


सेमीफायनलमध्ये जपानची स्टार खेळाडू नोजोमी ओकुहारानं पी. व्ही. सिंधूवर 21-7, 21-11 ने मात करत स्पर्धेची फायनल गाठली. विजेतेपदासठी नोजोमीला जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानी असलेल्या तैवानच्या ताय झू यिंगच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.


सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत यापूर्वी महिला एकेरीत सायना नेहवाल तर पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा यांना पराभवाचा धक्का बसल्याने ते यापूर्वीच स्पर्धेबाहेर पडले आहेत. तर आज पी. व्ही. सिंधूचा पराभव झाल्याने स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details