नवी दिल्ली -भारतीय बॅडमिंटन खेळाडू किदम्बी श्रीकांतला सध्या चीन येथे चालू असलेल्या आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्याच सामन्यात श्रीकांतला इंडोनेशियाच्या शेसार हिरेन हुस्तावितोच्या हाते 21-16, 22-20 असे पराभूत व्हावे लागले.
आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप: किदम्बी श्रीकांतला पराभवाचा धक्का, आव्हानही संपुष्टात - lost
श्रीकांतचा 51व्या स्थानी असलेल्या हुस्तावितोने 44मिनिटांमध्ये केला पराभव
किदम्बी श्रीकांत
जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या श्रीकांतला 51व्या स्थानी असलेल्या हुस्तावितोने 44मिनिटांत पराभव केला. या पराभवासह श्रीकांतचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी झालेला भारताचा दुसरा पुरुष खेळाडू समीर वर्माने मात्र दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. त्याच्यासोबत महिला एकेरीत सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधु यांनीही आपली पहिली फेरी जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय.