बँकॉक -भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालला थायलंड ओपन स्पर्धेतून रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सायनाचा पराभव झाला. तर, पुरुष टेनिसपटू किदाम्बी श्रीकांतने दुसऱ्या फेरीच्या सामन्यापूर्वी माघार घेतली. सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पालाही मिश्र दुहेरीत आपले आव्हान टिकवता आले नाही. या पराभवामुळे थायलंड ओपन स्पर्धेतील भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे.
थायलंड ओपन : भारताचे आव्हान संपुष्टात - सायना नेहवाल लेटेस्ट न्यूज
सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पालाही मिश्र दुहेरीत आपले आव्हान टिकवता आले नाही. या पराभवामुळे थायलंड ओपन स्पर्धेतील भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे.
६८ मिनटे रंगलेल्या सामन्यात थायलंडची खेळाडू बुसानन ओ.ने सायनाला २३-२१, २१-१४, २१-१६ असे हरवले. सायनाच्या पराभवामुळे महिला एकेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले. आतापर्यंतच्या दोन्ही खेळाडूंमधील हा सातवा सामना होता. बुसानानने चार तर सायनाने तीन सामने जिंकले आहेत.
सायना व्यतिरिक्त विश्वविजेती पी.व्ही. सिंधुला पहिल्याच फेरीतून माघारी परतावे लागले आहे. पुरुष एकेरीत श्रीकांतने दुखापतीमुळे दुसर्या फेरीच्या सामन्यातून माघार घेतली. जागतिक क्रमवारीत सध्या १४ व्या स्थानावर असलेला श्रीकांत गुरुवारी आठव्या मानांकित मलेशियाच्या ली जी जियाविरुद्ध खेळणार होता. तत्पूर्वी, पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी दुसऱ्या फेरीतून बाहेर पडले आहेत.