हैदराबाद -'एकेरीमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंची कामगिरी चिंताजनक आहे, या चिंतेविषयी मी काही आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांसह बीडब्ल्यूएफला पत्र लिहिले होते. मात्र, या मागण्या मान्य होतील असे वाटत नाही', असे भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत म्हटले आहे.
गोपीचंद यांची ईटीव्ही भारतशी खास मुलाखत हेही वाचा -दक्षिण आशियाई स्पर्धा : कुस्तीमध्ये भारताला १४ सुवर्ण
गोपीचंद यांनी मुलाखतीत बॅडमिंटन स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबतही आपले मत दिले. शिवाय, क्रीडाक्षेत्रात भारतात होणाऱ्या सुधारणांबाबत सरकारबद्दल विश्वासही व्यक्त केला. 'हो, माझा असा विश्वास आहे. गेल्या काही वर्षांपासून लोक खेळामध्ये अधिकच रस घेत आहेत. आणि हे सर्व भारत सरकारच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले आहे. अजून बरेच काही करण्याची गरज आहे. गेल्या दशकातील खेळ भारतासाठी चांगला होता', असे गोपीचंद यांनी म्हटले आहे.
आपल्या दैनंदिन जीवनाविषयी बोलताना गोपीचंद यांनी दररोज खेळामध्ये भाग घेणे महत्वाचे असल्याचे म्हटले आहे.