नवी दिल्ली - मलेशियाचा महान बॅडमिंटन खेळाडू ली चँग वेईने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली आहे. माजी जागतिक अग्रमानांकीत मलेशियन खेळाडू ली चँग वेईने आजवर बॅडमिंटनमधील अनेक मोठे किताब आपल्या नावावर केले आहेत. गेल्या वर्षी वेईला नाकाशी संबंधित कर्करोग झाल्याने काही काळ खेळू शकला नव्हता.
मलेशियाचा महान बॅडमिंटन खेळाडू ली चँग वेई निवृत्त - retirement
३६ वर्षीय वेईने आतापर्यंत सलग ३ ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये रौप्यपदक आपल्या नावावर केले आहे.
ली चँग वेई
३६ वर्षीय वेईने आतापर्यंत सलग ३ ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये रौप्यपदक आपल्या नावावर केले आहे. वेईच्या निवृत्तीमुळे त्याचे ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न मात्र अधुरे राहिले.
निवृत्तीबद्दल बोलताना ली चँग वेई म्हणाला, माझे बॅडमिंटनवर खूप प्रेम असून निवृत्तीचा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे नव्हते. जवळपास १९ वर्षे मी बॅडमिंटन खेळत आहे. यादरम्यान चाहत्यांनी दिलेल्या भरभरुन प्रेमाबद्दल मी खूप खूप आभारी आहे.