महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ऑल इंग्लंड ओपन: सिंधूची आगेकूच, सायना पहिल्या फेरीत गारद - श्रीकांत ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेतून बाहेर

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि गतविजेती पी. व्ही. सिंधूने विजयी सुरुवात केली. तर भारताची दुसरी खेळाडू सायना नेहवालचे पहिल्या फेरीत आव्हान संपुष्टात आले.

all-england-open-championship-pv-sindhu-into-second-round
ऑल इंग्लंड ओपन: सिंधूची आगेकूच, सायना पहिल्या फेरीत गारद

By

Published : Mar 18, 2021, 3:40 PM IST

बर्मिंगहॅम - ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि गतविजेती पी. व्ही. सिंधूने विजयी सुरुवात केली. तर भारताची दुसरी खेळाडू सायना नेहवालचे पहिल्या फेरीत आव्हान संपुष्टात आले.

सिंधूने पहिल्या फेरीत मलेशियाच्या सोनिया चीहचा २१-११, २१-१७ असा पराभव केला. तर सायनाला सातव्या मानांकित स्वित्झर्लंडच्या मिया ब्लिडफेल्टविरुद्धच्या सामन्यात रिटायर्ड हर्ट होऊन बाहेर व्हावे लागले. या सामन्यात ती ८-२१, ४-१० अशी पिछाडीवर होती.

पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत आणि पारुपल्ली कश्यपला पहिल्या फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला. श्रीकांतचा आयरलँडच्या एनगुयेन नहाट याने २१-११, १५-२१, २१-१२ असा पराभव केला. कश्यपचे आव्हान जपानच्या स्टार खेळाडू केटो मोमोटा याने २१-१३, २२-२० अशा फरकाने मोडीत काढले. तर, एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन, समीर वर्मा आणि बी साई प्रणीत यांनी दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे.

पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने निखार गर्ग आणि अनिरुद्ध मयेकर या इंडो-इंग्लिश जोडीचा २१-७, २१-१० असा पराभव करत पुढच्या फेरीत स्थान मिळवले.

हेही वाचा -कोरोनामुळे कॅनडा, यूएस ओपन स्पर्धा रद्द

हेही वाचा -भारताच्या माजी बॅडमिंटनपटूला ब्रेन ट्यूमर

ABOUT THE AUTHOR

...view details