मुंबई- युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (UWW) सर्व राष्ट्रीय संघांना भारतीय कुस्ती महासंघाबरोबरचे संबंध तोडून टाकण्याचे आदेश दिले आहेत. भारतात झालेल्या नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा दिला नाही म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.
भारतीय कुस्ती महासंघासोबत संबंध तोडून टाका - UWW चे सर्व राष्ट्रीय संघांना आदेश - व्हिसा
भारतात झालेल्या नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा दिला नाही म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.
भारतीय कुस्ती महासंघ ११
पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा दिला नाही म्हणून आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक महासंघाने भविष्यात भारतात होणाऱ्या स्पर्धांच्या आयोजनावर देखील बंदी घातली आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने सर्व राष्ट्रीय संघांना पत्र लिहिले आहे, युडब्लूडब्लू सर्व राष्ट्रीय संघांना आदेश देतो, की भारतीय कुस्ती महासंघासोबतचे आपले संबंध तोडून टाकण्यात यावेत.