नाशिक - स्नेहा कोकणे पाटील यांची कसलेली शरीरयष्टी एखाद्या पुरुषाला लाजवेल अशी आहे. पिळदार शरीरासाठी प्रचंड मेहनत आणि अथक कष्टामुळे शरीरसौष्ठवपटू स्नेहा यांनी डायमंड कप इंटरनेशनल सिल्वर पदक विजेतेपद पटकावले आहे.
'मर्दानी खेळात ती अव्वल', तिचं ध्येय ऑलिम्पिकचं मेडल..
तिला आतापर्यंत नाशिक श्री, महाराष्ट्र श्री हे पुरस्कार प्राप्त आहेत. एका स्त्रीला अनेक शारीरिक बंधने असतात पण जिद्द, चिकाटी ठेवली तर स्त्री सगळे बंधन झुगारुन यशस्वी होऊ शकते हे तिने सिद्ध केले आहे.
स्नेहा यांचे आयुष्य सर्वसाधारण होते. मात्र त्यांचा बॉडी बिल्डिंगचा प्रवास सुरु झाला लग्नानंतर. त्यांचे पती सचिन कोकणे पाटील ब्लॅक बेल्ट कराटे चैंपियन आहेत. तसेच ते पूर्ण महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वरक्षणाचे धडेही देतात. त्यांच्या साथीने आणि मार्गदर्शनाखाली स्नेहाने शरीरसौष्ठवपटू व्हायचे ठरवले. स्नेहा ही भारताला बॉडी बिल्डिंगमध्ये जागतिक स्तरावर नेणारी पहिली महिला आहे. तिला आतापर्यंत नाशिक श्री, महाराष्ट्र श्री हे पुरस्कार प्राप्त आहेत. एका स्त्रीला अनेक शारीरिक बंधने असतात पण जिद्द, चिकाटी ठेवली तर स्त्री सगळे बंधन झुगारुन यशस्वी होऊ शकते हे तिने सिद्ध केले आहे.
स्नेहा यांच्या घरचे वातावरण तसे तिला अनुकूल होते, वडील पैलवान असल्याने उपजतच तिला बॉडी बिल्डिंगची आवड निर्माण झाल्याची ती सांगते. लग्नानंतर तिने आपले पती सचिन यांना ही गोष्ट बोलून दाखवली आणि त्यांनी सुद्धा तिला साथ देत यासाठी प्रोत्साहन दिले. तिचा दिनक्रम रोज सकाळी पाच वाजल्यापासून सुरू होतो, सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळा ती दोन तास व्यायाम शाळेत मेहनत घेते. बॉडी बिल्डिंगसाठी लागणारा आहार देखील ती फॉलो करते. भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल मिळून देण्याचा चंग तिने मनाशी बाळगून तशी ती वाटचाल करत आहे. लग्नानंतर सुरु झालेला स्नेहाचा हा प्रवास सगळ्या महिलांसाठी खुप प्रेरणादायी आहे. तिच्या या अनोख्या जिद्दीला सलाम!