महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हृतिक रोशनच्या 'या' सुपरहिट गाण्यावर चीनमध्ये थिरकली यामी, व्हिडिओ व्हायरल - ek pal ka jeena

हृतिक रोशन आणि यामीचा 'काबिल' चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित  होणार आहे. अलिकडेच यामी आणि हृतिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये यामी हृतिकसोबत त्याच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

हृतिक रोशनच्या 'या' सुपरहिट गाण्यावर चीनमध्ये थिरकली यामी, व्हिडिओ व्हायरल

By

Published : Jun 3, 2019, 8:05 AM IST

मुंबई -'हँडसम हंक' हृतिक रोशन आणि यामी गौतम दोघेही सध्या चीनमध्ये त्यांच्या 'काबिल' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेले आहेत. भारतीय प्रेक्षकांनी 'काबिल' चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. भारतीय चित्रपटांना चीनी बॉक्स ऑफिसवरदेखील चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळेच हृतिक रोशन आणि यामीचा 'काबिल' चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. अलिकडेच यामी आणि हृतिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये यामी हृतिकसोबत त्याच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

हृतिक रोशनने बॉलिवूडमध्ये 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर तो अल्पावधीतच सुपरस्टार झाला. या चित्रपटातील 'एक पल का जीना' हे गाणेदेखील लोकप्रिय झाले आहेत. या गाण्यातील हृतिकची स्टेपदेखील त्याची सिग्नेचर स्टाईल बनली. याच गाण्यावर यामी आणि हृतिकने धमाल डान्स केला.

हृतिक रोशनसोबत थिरकली यामी

यामी आणि हृतिकच्या या डान्सला चीनी प्रेक्षकदेखील त्यांना भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. चीनमध्येही हृतिकच्या चाहत्यांचीही मोठी संख्या आहे. आपला आवडता कलाकार पाहून चीनी चाहते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

यामी
यामी
यामी

हृतिक हा लवकरच 'सुपर ३०' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. ४ जूनला या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details