महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सिध्दार्थ घरी परतला तेव्हा त्याच्या कारची काच फुटली होती..नेमक रात्री काय घडले? - सिध्दार्थच्या कारची काच फुटली होती

सिध्दार्थ रात्री उशीरा आपल्या बीएमडब्लू कारने जेव्हा घरी परतला तेव्हा त्याच्या कारची मागची काच फुटली होती. त्याचे कोणाशी भांडण झाले होते का? त्याच्या मृत्यूशी या घटनेचा काही संबंध आहे का? अशी शंका आता उपस्थित होत आहे.

सिध्दार्थ शुक्लाचा मृत्यू
सिध्दार्थ शुक्लाचा मृत्यू

By

Published : Sep 2, 2021, 3:16 PM IST

मुंबई - लोकप्रिय टीव्ही अभिनेता सिध्दार्थ शुक्लाच्या निधनाने अवघे सिनेविश्व दुःखी आहे. प्रसिध्दीच्या कळसाकडे जाणाऱ्या या तरुण कलाकाराचे निधन झाले यावर चाहत्यांचा विश्वासच बसत नाही. सिध्दार्थचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु अद्याप मुंबई पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार सिध्दार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी औषधांचे सेवन केले होते. मात्र सकाळी त्याला जाग आलीच नाही. दरम्यान त्याच्या मृत्यूशी संबंधीत आणखी एक धक्कादायक बाब पुढे येत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार सिध्दार्थ काल रात्री बाहेर गेला होता. रात्री उशीरा तो आपल्या बीएमडब्लू कारने घरी परतला. घरी परतला तेव्हा त्याच्या कारची मागची काच तुटलेली आढळली आहे. यामुळे काल रात्री त्याचे कोणाशी भांडण तर झाले नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे. सिध्दार्थच्या कारची काच कशी फुटली हे कोडे अद्याप गुलदस्त्यात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार सिध्दार्थच्या कुटुंबीयांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. सकाळी त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा अगोदरच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा पोस्ट मार्टम रिपोर्ट अद्याप उपलब्ध झालेला नाही. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत.

हेही वाचा - मनोरंजन विश्वावर शोककळा! सिद्धार्थ शुक्लाच्या निधनावर 'या' कलाकारांनी व्यक्त केले दुःख

ABOUT THE AUTHOR

...view details