महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'आजपासून स्वत:वर प्रेम करा', महिलादिनानिमित्त विद्या बालनची खास पोस्ट!

आज  देशभरात 'जागतिक महिला दिन' साजरा केला जात आहे. देशभरात सर्व क्षेत्रातून महिलांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. कलाक्षेत्रातूनही महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री विद्या बालन हिनेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विद्या बालन

By

Published : Mar 8, 2019, 9:24 PM IST

मुंबई - आज देशभरात 'जागतिक महिला दिन' साजरा केला जात आहे. देशभरात सर्व क्षेत्रातून महिलांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. कलाक्षेत्रातूनही महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री विद्या बालन हिनेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


विद्याने या पोस्टमधून महिलांना स्वत:वर प्रेम करा, असे म्हटले आहे. याआधी तुम्ही स्वत:वर प्रेम केले नसेल, तर आजपासून स्वत:वर प्रेम करायला शिका. तुम्ही जसे आहात, तसे स्वत:ला स्वीकारा. जे लोक तुम्हाला जाणून न घेता तुमच्याबद्दल मतं बनवत असतील, त्यांची मते मांडली गेल्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होत असेल, तर अशा लोकांचा विचार करणं सोडून द्या.
दुसऱ्यांसोबत स्वत:ची तुलना करू नका. प्रत्येक गोष्टीत मला सर्वोत्तम व्हायचे आहे हा विचार करू नका. तुम्ही जसे आहात तसेच सर्वोत्तम आहात. पुन्हा दुसरा दिवस आहे. त्यावेळी अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करा पण कोणाशीही तुलना करू नका.

दुसऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा स्वत:वर विश्वास ठेवा. आजपासून स्वत:वर प्रेम करा. केवळ आजच नाही तर दररोज स्वत:वर प्रेम करायला शिका. आजचा दिवस जगायला शिका आणि तुमचा आत्मविश्वासही कायम ठेवा, असे विद्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे.


विद्याच्या या पोस्टवर चाहत्यांनीही भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details