मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि कॅटरिना कैफचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 'सुपर डांसर चॅप्टर 3' या डान्स रियॅलिटी शोमध्ये दोघी सलमान खानला खूश करण्यासाठी नाचताना दिसतात. मात्र त्यांचा हा डान्स पाहून भाईजान झोपी गेल्याचे दिसते. हा व्हिडिओ जरी जुना असला तरी सोशल मीडियावर याचा जोरदार प्रसार झाला आहे.
Video viral: शिल्पा शेट्टी आणि कॅटरिनाचा हटके डान्स पाहून सलमान गेला झोपी - Suryavansham
डान्स रियॅलिटी शोमध्ये दोघी सलमान खानला खूश करण्यासाठी शिल्पा शेट्टी आणि कॅटरिना नाचताना दिसतात. मात्र त्यांचा हा डान्स पाहून भाईजान झोपी जातो. असा हा व्हिडिओ जरी जुना असला तरी सोशल मीडियावर याचा जोरदार प्रसार झाला आहे.
हा व्हिडिओ कॅटरिना कैफच्या फॅन क्लबने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. यात कॅटरिना भारत चित्रपटातील 'एत्थे आ' या गाण्यापेक्षाही कहर डान्स करताना दिसतेय. कॅटरिना आणि शिल्पाच्या या जबरदस्त डान्सवर सलमान फिदा होण्या ऐवजी चक्क झोपी गेल्याचे सोंग करतो. शोमधील जजेसही सलमानचा हा अवलिया मुड पाहून हसायला लागतात. प्रेक्षकांनीही जोरदार हंगामा केलाय.
कामाच्या पातळीवर सलमान आणि कॅटरिनाचा भारत हा सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तुफान कमाई केली. लवकरच कॅटरिना अक्षय कुमारसोबत सुर्यवंशम चित्रपटात झळकणार आहे.