मुंबई - ज्येष्ठ रंगकर्मी आणि अविष्कार नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा अरुण काकडे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पन्नास वर्षे त्यांनी रंगभूमीची सेवा केली. त्यांच्या जाण्याने प्रयोगशील रंगभूमीवरचा एक अवलिया हरपल्याची भावना नाट्यवर्तुळात आहे.
ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे दीर्घ आजाराने निधन - अरुण काकडे न्यूज
ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने प्रयोगशील रंगभूमीवरचा एक अवलिया हरपल्याची भावना नाट्यवर्तुळात आहे.
पंढरपूर येथे २०१४ मध्ये पार पडलेल्या ९४ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नाटकाच्या सृजनात्मक प्रक्रियेसोबतच संस्थात्मक जडणघडण, नाट्यव्यवस्थापन, नाटककार-दिग्दर्शन-अभिनय-शिबिरांचे आयोजन, बालरंगभूमीवरील त्यांचे योगदान, विविध नाट्यमहोत्सव अशा अनेक आघाड्यांवर अरुण काकडे सातत्याने प्रयोगकर्त्याच्या भूमिकेतून कार्यरत होते.
ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांना ‘मेटा’ (महिंद्रा एक्सेलन्स इन थिएटर अवॉर्ड्स) तर्फे २०१७ चा ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान कऱण्यात आला होता.