मुंबई - सध्या मराठी मनोरंजनसृष्टीत आनंदाचे वातावरण आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले असून आता राज्यातही शूटिंगची परवानगी देण्यात आली असल्यामुळे निर्माते खूष आहेत. बऱ्याच चित्रपटांची चित्रीकरणं रखडली आहेत आणि बऱ्याच मालिकांचे शूटिंग परराज्यात होत होते, ज्यात ‘राजा रानीची गं जोडी’ आणि ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकांचाही समावेश आहे. या मालिकांमध्ये प्रेक्षकांना बांधून ठेवणारी वळणं येत असून मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होताहेत. आता या दोन्ही मालिकांत वटसावित्रीचा सण साजरा होताना दिसणार आहे. ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेत नुकतीच फौजदार झालेली संजू नोकरीचं आणि घराचं कर्तव्य पार पडताना दिसणार असून संजूची आगळीवेगळी वटपौर्णिमा बघता येणार आहे. तसेच ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत अभिमन्यू-लतिकाच्या लग्नाचे सत्य येणार समोर आल्यामुळे प्रेक्षकांना नवीनच ट्विस्ट अनुभवायला मिळणार आहे.
वर्ष ऋतू सुरु झाली की सणांची रेलचेल सुरु होते. ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. सौभाग्याचं प्रतिक आणि सौभाग्यवतीचे फणी करंडा, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तिथे अर्पण करतात. वडाला पाच प्रदिक्षणा मारून सूत गुंडाळतात. मनोभावे वटवृक्ष राजाचे पूजन करतात. कलर्स मराठीवरील 'राजा रानीची गं जोडी' आणि 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेमध्ये संजू आणि लतिका वटपौर्णिमा साजरी करणार आहेत. संजूची वटपौर्णिमा जरा आगळीवेगळी असणार आहे. नोकरीचं आणि घराचं कर्तव्य संजू पार पाडताना दिसणार आहे. यामध्ये तिला रणजीतची खंबीर साथ देखील मिळणार आहे. तर, सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये लतिका आणि अभीच्या लग्नाचे सत्य कामिनी सगळ्यांसमोर आणणार आहे. यानंतर दोघांचे नाते कुठलं नवं वळण घेणार आणि लतिका आणि अभी कसे या घटनेला सामोरे जाणार व घरच्यांना कसे सांभाळणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
राजा रानीची जोडी मालिकेमध्ये एक नवा अध्याय सुरू झाला आहे. संजूने आता रणजीतचे स्वप्न पूर्ण केले आहे. PSI झाल्यापासून तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. पण संजू घर आणि नोकरी या दोन्ही जबाबदार्या उत्तमरीत्या पार पाडताना दिसते आहे. राजश्री आणि अपर्णा दोघी मिळून संजूसाठी काही ना काही अडचणी निर्माण करण्याचा सतत प्रयत्न देखील करत आहेत. पण त्यांच्या सगळ्या कारस्थानांना संजू उत्तर देत आहे. याच सगळ्यामध्ये आता अजून एक भर म्हणजे गुलाब भोसले. गुलाब संजूच्या पहिल्या दिवसापासून विरोधातच आहे. त्यामुळे संजीवनीची वटपौर्णिमेची पूजा कशी पूर्ण नाही होणार याच्या प्रयत्नात गुलाब आहे तर दूसरीकडे कुसुमावतीला देखील संजूने वटपौर्णिमाची पूजा करणार असे वचन दिले आहे. रणजीतच्या साथीने संजू ही पूजा कशी पार पाडणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.अभि-लतीचे लग्न कोणत्या परिस्थितीत झाले हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण बापूंचे पैसे मिळाल्यावर अभी लतिकाला बापूंना साभार परत करणार हे मात्र घरातील कोणालाच माहिती नाही. अभिमन्यू आणि लतिकाने हे सत्य सगळ्यांपासून लपवून ठेवले. आता मात्र लतिका निर्णयावर पोहचली आहे की ती अजून त्यांच्या नात्याबद्दल अजून लपवू शकणार नाही आणि सगळ्यांना सांगणार. कामिनीला मात्र हे सत्य माहिती आहे आणि ती वटपौर्णिमेच्या दिवशी लतिका आणि अभिच्या घरच्यांसमोर ही गोष्ट उघडकीस आणणार आहे, की यांचे लग्न खोटं आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका प्रसारित होते, सोम ते शनि रात्री ९.०० वा. आणि ‘राजा रानीची गं जोडी’ ही मालिका प्रसारित होते कलर्स मराठीवर ज्यावर या मालिकांचे वटपौर्णिमा विशेष भाग दाखविले जाणार आहेत.