'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेत सीड ला वाचविण्यासाठी अदिती मुद्दाम घरातल्यांनी तिचा तिरस्कार करावा अशी वागू लागते. त्यासाठीच अदिती पाश्चात्य वन-पिस ड्रेस घालून येते आणि मुद्दाम अशा काही गोष्टी करते जेणेकरून कुटुंबियांना तिचा राग येईल. अदितीच्या अशा वागण्यामुळे देशमुख कुटुंबीय दुखावतात परंतु नंतर सत्य समोर येते.
लोकप्रिय मालिका 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' आता एका विलक्षण वळणावर आली आहे. सिद्धार्थ अमेरिकेच्या हट्टापायी कुटुंबियांच्या मनाचा, त्यांच्या भावनांचा बिलकुल विचार करत नाहीये. सिद्धूच्या हिस्सा मागण्याने आता देशमुखांच्या चुली वेगळ्या होणार अशी भिती बयो आजीला वाटते. पण अदिती त्यांना विश्वास देते की, ती असं कधीही होऊ देणार नाही. तात्यांच्या निर्णयानुसार सगळे मिळून सीडला थोडी थोडी पैशांची मदत करायची ठरवतात. पण मिलिंदच्या सांगण्यावरुन सिद्धार्थ ती मदत नाकारतो आणि मला प्रॉपर्टीमधला हिस्साच हवा यावर अडून बसतो.