महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 28, 2020, 5:28 PM IST

ETV Bharat / sitara

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 'कुली नंबर 1'चा ट्रेलर रिलीज

बहुप्रतीक्षित 'कुली नंबर 1' चित्रपटाचा ट्रेलर शनिवारी रिलीज केला आहे. दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा हा 'कुली नंबर 1' आगामी चित्रपट म्हणजे १९९५मधील गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या चित्रपटाचा त्याच नावाचा रीमेक आहे. या चित्रपटात वरुण धवन आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत.

'Coolie No. 1'
'कुली नंबर 1'

मुंबई - अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओने बहुप्रतीक्षित 'कुली नंबर 1' चित्रपटाचा ट्रेलर शनिवारी रिलीज केला आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रसारित होईल. दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा हा 'कुली नंबर 1' आगामी चित्रपट म्हणजे १९९५मधील गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या चित्रपटाचा त्याच नावाचा रीमेक आहे. या चित्रपटात वरुण धवन आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय या चित्रपटात परेश रावल, जावेद जाफरी, जॉनी लीव्हर आणि राजपाल यादव यांच्यासह अन्य कलाकारही दिसणार आहेत.

या चित्रपटाची निर्मिती बासू भगानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांनी केली आहे. याचा खास प्रीमियर २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या संध्याकाळी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर होईल. हा चित्रपट प्राइमच्या माध्यमातून जगभरातील २०० देशांमध्ये व प्रदेशात प्रदर्शित होईल.

हेही वाचा - चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदावरून मेघराज राजेभोसले यांची हकालपट्टी; अविश्वास ठराव मंजूर

दिग्दर्शक डेव्हिड धवन या चित्रपटाविषयी म्हणाले की, "भारतीय करमणुकीसाठी ही खरोखरच थरारक काळ आहे. खूप मेहनतीने बनवलेला हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे याचा मला आनंद वाटतो. प्रतिसाद पाहण्यासाठी उत्सुक आहे. "

अभिनेता वरुण धवन म्हणतो, "मला नेहमीच 'कुली नंबर 1' ची पटकथा आणि त्यातील कलाकारांची कामगिरी आवडली. या क्लासिक चित्रपटाच्या रीमेकमध्ये काम करणे माझ्यासाठी खूप खास आहे, हे एक कारण आहे. या भूमिकेची तयारी करायलाही खूप मजा आली होती. एक अभिनेता म्हणून या विनोदी चित्रपटाच्या रीमेकमध्ये काम करणे खरोखरच मजेदार आहे. जगभरातील प्रेक्षक खास 'कुली नंबर 1' पाहून ख्रिसमस साजरा करतील."

हेही वाचा - 'महाराष्ट्राच्या इतिहासात असे धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत'

ABOUT THE AUTHOR

...view details