मुंबई - गायक पती निक जोनाससमवेत आपला 38 वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर दुसर्या दिवशी अभिनेत्री प्रियांका चोप्रा-जोनासला रविवारी दोन वर्षांपूर्वी निकने तिच्यासमोर ठेवलेला लग्नाचा प्रस्ताव पुन्हा आठवला आहे.
प्रियंकाने एक गोंडस मिरर सेल्फी पोस्ट करून आपल्या पतीवर प्रेम दाखवले आहे. ज्यामध्ये निक प्रियंकाच्या गालावर चुंबन घेताना दिसत आहे. गायक निक जोनासने तिला जेव्हा पहिल्यांदा लग्नाविषयी विचारले त्याबद्दल प्रियंकाने प्रेमपत्र लिहिले आहे.
"माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद. २ वर्षांपूर्वी या दिवशी तू मला तुझ्याशी लग्न करायला सांगितलेस. तेव्हा मी कदाचित आवाक झाले असले तरी मी प्रत्येक क्षणाला तुला हो म्हणते," असे तिने लिहिले आहे.
ती म्हणाली, "या विकेंडला तू सर्वात अभूतपूर्व वेळात अविश्वसनीयपणे संस्मरणीय बनवलंस. नेहमीच माझ्याबद्दल विचार केल्याबद्दल धन्यवाद. मी जगातील सर्वात भाग्यवान मुलगी आहे! मी तुझ्यावर प्रेम करते निकजोनास, असेही " ती पुढे म्हणाली.