महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

इस्राईली सिरीज 'केवोडो'चे अधिकृत रूपांतर 'युअर ऑनर'चा दुसरा सीझन सोनी लिव्‍हवर! - Israeli series Kevodo

इस्राईली सिरीज 'केवोडो'चे अधिकृत रूपांतर असलेल्या 'युअर ऑनर' वेब सिरीजने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता या मालिकेचा (The second season of 'Your Honor' on Sony Live)दुसरा सिझन येत आहे. अधिक मनोरंजक असलेल्या मालिकेचा स्तर उंचावण्यासाठी यात काही नवी पात्रे दिसणार आहेत. अभिनेत्री माही गिल व गुलशन ग्रोव्हर

'युअर ऑनर'चा दुसरा सीझन सोनी लिव्‍हवर
'युअर ऑनर'चा दुसरा सीझन सोनी लिव्‍हवर

By

Published : Nov 23, 2021, 4:17 PM IST

Updated : Nov 23, 2021, 4:53 PM IST

सध्या गाजलेल्या वेब सिरीजच्या सिक्वेल्सची रेलचेल दिसतेय. त्यानुसार आता सोनी लिव्‍हची पहिली ओरिजिनल सिरीज 'युअर ऑनर' दुस-या सीझनसह (The second season of 'Your Honor' on Sony Live)पुनरागमन करत आहे. नैराश्‍याच्‍या काळात नैतिकता व सन्‍मान अशी सर्व मूल्‍ये नाहीशी होतात आणि अस्तित्त्वाला प्राधान्‍य दिले जाते. कौटुंबिक प्रामाणिकपणा व सूड घेण्‍याचा प्रयत्‍न बिशन खोसलाच्‍या जीवनाला पछाडून टाकण्‍यास परतत आहे. एकेकाळी न्‍याय व प्रामाणिकपणाचे प्रतीक असलेल्‍या बिशन खोसलाच्‍या पहिल्‍या सीझनमधील संशयास्‍पद निर्णयांचा आता कथानकामधील लक्षवेधक ट्विस्‍ट्स व नवीन प्रतिस्‍पर्धींसह उलगडा होणार आहे. बिशन खोसलाविरोधातील कटकारस्‍थानाने या सीझनला अधिक रोमांचक केले आहे.

ई निवास यांचे दिग्‍दर्शन असलेली 'युअर ऑनर २' (E Niwas directed 'Your Honor 2')मनोरंजनाचा स्‍तर उंचावण्‍याची खात्री देते. या वेळेस दोन नवीन कॅरेक्टर्स दिसणार असून, 'बॅड मॅन' गुलशन ग्रोव्‍हर ('Bad Man' Gulshan Grover)आणि मोहक माही गिल(Mahi Gill), जिम्‍मी शेरगिल (Jimmy Shergill) विरोधात आमना-सामना करताना दिसतील. खोसला मुडकिससोबत गुरजोत (गुलशन ग्रोव्‍हर) व यशप्रीत (माही गिल) यांच्या नेतृत्‍वांतर्गत असलेल्‍या खुनशी टर्न टर्न गँगचा देखील सामना करतो. काहीसे मागे जात सूड घेण्‍याचा प्रयत्‍न प्रामाणिकपणाला मागे टाकतो. बिशन खोसला त्‍याचे जीवन वाचवण्‍यासाठी जगाचा सामना कसा करतो ये सविस्तरपणे ‘युअर ऑनर'च्‍या दुस-या सीझनमध्ये दर्शविण्यात आले आहे.

'बॅड मॅन' गुलशन ग्रोव्‍हर

दिग्‍दर्शक ई निवास म्हणाले, “'युअर ऑनर सीझन २' ही जटिल कथा स्‍वत:चा प्रामाणिकपणा व न्‍याय यांच्‍यामधील संघर्षाच्‍या जटिल समस्‍यांना दाखवते. बिशन खोसला व अंडरवर्ल्‍ड यांच्‍यामधील नवीन प्रतिस्‍पर्धा निश्चितच प्रेक्षकांना मनोरंजनपूर्ण व रोमांचक अनुभव देईल. कलाकारांनी सिरीजमधील लक्षवेधक, पण जटिल भूमिका साकारताना उत्तम अभिनय साकारलेला आहे. मला खात्री आहे की, प्रेक्षक या प्रखर क्राइम ड्रामाच्‍या दुस-या सीझनचे देखील तितकेच कौतुक करतील.''

'युअर ऑनर'चा दुसरा सीझन सोनी लिव्‍हवर

आशिष गोलवलकर, प्रमुख-कन्‍टेन्‍ट, सोनी एंटरटेन्‍मेंट टेलिव्हिजन, सोनी लिव्‍ह, सोनी पिक्‍चर्स नेटवर्क्‍स इंडिया म्हणाले, '''युअर ऑनर' ही सोनी लिव्‍ह २.० वरील पहिली सिरीज असल्‍यामुळे सीझन २ सह ही सिरीज पूर्ण होत असताना खूपच चांगले वाटत आहे. यात प्रतिभावान कलाकारांची भर असून सिरीजला रोमांचक वळण मिळाले आणि सिरीज अधिक लक्षवेधक झाली आहे. लक्षवेधक व सर्वसमावेशक कथानकांसह आम्‍ही आमच्‍या अस्‍सल व स्‍वदेशी कथानकाच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्‍यास कटिबद्ध आहोत. अधिक पुढे जात आम्‍ही प्रेक्षकांसाठी पॉवर-पॅक शोज सादर करण्‍यास उत्‍सुक आहोत.''

अभिनेत्री माही गिल म्हणाली, ''या सिरीजचा भाग बनल्‍याचे खूपच आनंद होत आहे. या सिरीजचा पहिला सीझन खूपच यशस्‍वी ठरला. एक कलाकार म्‍हणून 'युअर ऑनर २' सारख्‍या सिरीजमध्‍ये काम करणे लाभदायी अनुभव होता. प्रबळ कथानक, प्रतिभावान कलाकार व यशस्‍वी पहिल्‍या सीझनसह दुस-या सीझनसाठी उत्‍साह उंचावर पोहोचलेला आहे. आशा करते की, प्रेक्षक पहिल्‍या सीझनप्रमाणेच 'युअर ऑनर २'शी देखील संलग्‍न होतील.”

समीर नायर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी, अप्‍लॉज एंटरटेन्‍मेंट म्हणाले, ''अप्‍लॉजमध्‍ये आम्‍हाला सोनी लिव्‍हसोबत सहयोगाने काम करण्‍याचा आनंद होत आहे. 'युअर ऑनर' ही २.० ची पहिली सिरीज असल्‍यामुळे हा सहयोग अधिक खास बनला आहे. ई-निवास सोबत अशा प्रतिभावान कलाकारांनी सिरीजच्‍या रोमांचक दुस-या सीझनबाबत उत्‍सुकता निर्माण केली आहे. आमचा प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहण्‍याचा मनसुबा आहे आणि सोनी लिव्‍हवर 'युअर ऑनर २'सह अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्‍याची आशा करतो.''

जिम्‍मी शेरगिल

प्रमुख अभिनेता जिम्‍मी शेरगिल म्हणाला, “'युअर ऑनर' रोमांचक अनुभव देणारी सिरीज राहिली आहे. ही एका न्‍यायाधीशाची कथा आहे, जो त्‍याच्‍या मुलाच्‍या संरक्षणासाठी स्‍वत:च्‍या प्रतिज्ञेविरोधात जातो. तसेच ही सिरीज वडिल व मुलामधील प्रखर नात्‍याला देखील सादर करते. पहिल्‍या सीझनमधील अनुभव अपवादात्‍मक होता आणि या सीझनमध्‍ये गुलशन ग्रोव्‍हर यांच्यासोबतच्‍या अंतिम आमना-सामन्यासह तो अधिक उत्‍साहवर्धक होणार आहे. समीकरण व केमिस्‍ट्री पाहण्‍यासारखी असणार आहे. मी अॅप्‍लॉज एंटरटेन्‍मेंट व सोनी लिव्‍हसोबत माझ्या दुस-या सीझनसाठी खूपच उत्‍सुक आहे.''

नवीन एन्ट्री गुलशन ग्रोव्‍हर म्हणाले, “ओटीटीवर कन्‍टेन्‍टचा सपाटा सुरू आहे आणि सोनी लिव्‍हवर अशा लोकप्रिय सिरीजच्‍या दुस-या सीझनचा भाग असल्‍याने खूपच चांगले वाटत आहे. मी शक्तिशाली टोळीचा प्रमुख असलेल्‍या उद्योगपतीची भूमिका साकारण्‍याचा छान आनंद घेतला आहे. पहिल्‍या सीझनच्‍या अविश्‍वसनीय कथानकाने मला या भूमिकेसाठी संदर्भ दिला. मला खात्री आहे की, बिशन खोसला आणि शक्तिशाली अंडरवर्ल्‍ड यांच्‍यामधील आमना-सामना पाहण्‍यासाठी अविश्‍वसनीय व रोमांचक असणार आहे.”

अप्‍लॉज एंटरटेन्‍मेंटसह स्‍पेअर ओरिजिन्‍सने 'युअर ऑनर सीझन २'ची निर्मिती केली आहे. हा शो येसटीव्‍ही व कोडा कम्‍युनिकेशन्‍स निर्मित इस्राईली सिरीज 'केवोडो'चे अधिकृत रूपांतरण आहे. या सिरीजमध्‍ये प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत, जसे मिता वशिष्‍ट (किरण सेखोन), सुहासिनी मुळे (शील), रिचा पल्‍लोद (इंदू), पुल्कित माकोल (अबीर). 'युअर ऑनर २' सोनी लिव्‍हवर १९ नोव्‍हेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झाली आहे.

हेही वाचा - मकरंद माने दिग्दर्शित ‘पोरगं मजेतय’ पोहोचला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात!

Last Updated : Nov 23, 2021, 4:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details