मुंबई -फोटो रिअलिस्टिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार करण्यात आलेला 'द लॉयन किंग' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाचे हिंदी व्हर्जनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हा चित्रपट एकप्रकारे संगणक अॅनिमेटेड म्यूझिकल आहे. १९९४ साली आलेल्या 'द लॉयन किंगचा'च हा रिमेक आहे. मात्र, या चित्रपटात फक्त एक रिअल शॉट वापरण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक जोन फेवरियू (jon favreau) यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.
जोन यांनी हा फोटो आफ्रिकामध्ये काढला होता. उगवत्या सूर्याचा हा फोटो एकमेव रिअल शॉट आहे. त्यांनी सांगितले, की या चित्रपटात १४९० असे शॉट आहेत ज्यांना अॅनिमेशन आणि सीजी आर्टिस्टने तयार केले आहेत.
जोनने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे.