'ताश्कंद फाईल'चं पहिलं गाणं प्रदर्शित, पाहा 'सारे जहाँ से अच्छा' गाण्याचा नवा रिदम ! - mandira bedi
देशभक्तीवर आधारित गाणं म्हटलं की 'सारे जहाँ से अच्छा' हे गाणे आपोआपच डोळ्यासमोर येते. हेच गाणे 'ताश्कंद फाईल'मध्येही पाहायला मिळणार आहे. मात्र, यावेळी या गाण्याचा रिदम हटके पद्धतीचा वापरण्यात आला आहे.
मुंबई -भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या रहस्यमयी मृत्यूमागील काही तपशील आगामी 'ताश्कंद फाईल' या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे.
देशभक्तीवर आधारित गाणं म्हटलं की 'सारे जहाँ से अच्छा' हे गाणे आपोआपच डोळ्यासमोर येते. हेच गाणे 'ताश्कंद फाईल'मध्येही पाहायला मिळणार आहे. मात्र, यावेळी या गाण्याचा रिदम हटके पद्धतीचा वापरण्यात आला आहे. सध्या अनेक चित्रपटांमध्ये रॅप गाण्याचा ट्रेण्ड सुरु आहे. हाच ट्रेण्ड या गाण्यासाठीही वापरण्यात आला आहे. 'सारे जहाँ से अच्छा' गाण्याची जुनी चाल आणि त्यानंतर लगेचच रॅपचा रिदम या गाण्यात ऐकायला मिळतो.